मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Traffic Rules for Minor: सावधान! अल्पवयीन मुलांच्या हातात गाडी देणं पडेल महागात, होऊ शकते 'ही' कारवाई

Traffic Rules for Minor: सावधान! अल्पवयीन मुलांच्या हातात गाडी देणं पडेल महागात, होऊ शकते 'ही' कारवाई

Traffic Rules for Minor: सावधान! अल्पवयीन मुलांच्या हातात गाडी देणं पडेल महागात, होऊ शकते 'ही' कारवाई

Traffic Rules for Minor: सावधान! अल्पवयीन मुलांच्या हातात गाडी देणं पडेल महागात, होऊ शकते 'ही' कारवाई

Traffic Rules for Minor: अनेकदा तर पालकच त्यांच्या अल्पवयीन मुलगा किंवा मुलीला गाडी शिकवण्यास सुरुवात करतात; पण हे कायद्याने चुकीचे व बेजबाबदारही आहे. अल्पवयीन मुलांना वाहन चालवताना पकडलं गेल्यास मोठा दंड आणि तुरुंगवासाची तरतूद आहे.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 3 ऑक्टोबर: अल्पवयीन असल्यानं गाडी चालवण्याचं लायसन्स मिळत नसलं तरी अशा मुलांचं गाडी चालवण्याचं प्रमाण वाढत आहे. या मुलांना टू-व्हीलर कशी चालवायची, याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण नसतं. बॅलन्स सांभाळता आला म्हणजे गाडी आली, असा समजलं जातं. वाहतुकीच्या नियमांची माहिती नसते. पण तरीही पालकांकडून त्यांना गाडी दिली जाते. मात्र अशा पद्धतीने मुलांना गाडी चालवण्यास देणं पालकांसाठी खूपच महाग पडेल.

गाव असो की शहर, आजकाल टू-व्हीलर आणि फोर-व्हीलर गाड्यांचा छंद लहानपणापासूनच जडतो. घरात गाडी असेल तर विचारालयाच नको. त्यातच आजची मुलं टेक्नोसॅव्ही असल्यामुळे ती एखादी गोष्ट लवकर आत्मसात करतात. अनेकदा तर पालकच त्यांच्या अल्पवयीन मुलगा किंवा मुलीला गाडी शिकवण्यास सुरुवात करतात; पण हे कायद्याने चुकीचे व बेजबाबदारही आहे. अल्पवयीन मुलांना वाहन चालवताना पकडलं गेल्यास मोठा दंड आणि तुरुंगवासाची तरतूद आहे.

नियम काय सांगतो?

मोटर वाहन कायद्यानुसार, 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना वैध लायसन्सशिवाय 50 सीसीपेक्षा जास्त क्षमतेचं इंजिन असलेलं वाहन चालवण्याची परवानगी नाही. वाहनाच्या इंजिनची क्षमता 50 सीसीपेक्षा जास्त असल्यास लर्निंग लायसन्स असणं आवश्यक आहे. तसंच कोणीही 25 किलोमीटर प्रतितास वेगाने धावणारी इलेक्ट्रिक टू-व्हीलर चालवू शकतो. यासाठी कोणत्याही प्रकारच्या लायसन्सची किंवा रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही. परंतु, जर मुलगा किंवा मुलगी खूप लहान असेल, आणि गाडी चालवू शकत नसेल, तर अशावेळी मुलाच्या सुरक्षिततेबरोबरच इतरांच्या सुरक्षिततेचा विचार करणं ही पालकांची जबाबदारी बनते. पालकांनी त्यांच्या मुलाला कायद्याने विहित केलेली वयोमर्यादा पूर्ण केल्याशिवाय गाडी चालवण्याची परवानगी देऊ नये.

हेही वाचा: हॉस्टेल किंवा पीजीमध्ये राहाणाऱ्या मुलींनी 'या' गोष्टींची नेहमी घ्या काळजी, कधीही होणार नाही फसवणूक

तब्बल 25000 रुपये दंडाची तरतूद:

ज्या मुलाचं वय 18 वर्षे पूर्ण झालं नसेल, आणि तो गाडी चालवताना पकडला गेला, तसंच त्याच्याकडे लर्निंग लायसन्ससुद्धा नसेल, तर मोटर वाहन कायदा 1988 च्या कलम 199 A नुसार ज्याच्या नावावर वाहन नोंदणीकृत आहे, त्याला 25,000 रुपयांपर्यंत दंड आणि 3 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. कायद्यामध्ये तशी तरतूद करण्यात आलीय.

अल्पवयीन मुलांच्या हातात अनेकदा पालकच टू-व्हीलर किंवा फोर-व्हीलर देतात. मात्र, यामुळे स्वतःच्या अल्पवयीन मुलांसोबतच इतर वाहनचालकांचेही जीव धोक्यात टाकत असल्याचे अनेक पालकांच्या लक्षात येत नसल्याचे चित्र आहे. पण अल्पवयीन मुलगा गाडी चालवताना सापडल्यास मोठ्या दंडासह तुरुंगात जाण्याची वेळही येऊ शकते, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

First published:

Tags: Traffic, Traffic Rules