Home /News /money /

Amazon ला आणखी एक झटका! CCI चे प्राइम सेलरच्या ठिकाणांवर छापे, व्यापारी संघटना म्हणते..

Amazon ला आणखी एक झटका! CCI चे प्राइम सेलरच्या ठिकाणांवर छापे, व्यापारी संघटना म्हणते..

Amazon

Amazon

फ्युचर-रिलायन्स डीलबाबत आधीच अडचणींचा सामना करत असलेल्या ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. एक मोठी कारवाई करत भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) कंपनीच्या प्राइम सेलरच्या जागेवर छापा टाकला आहे.

    नवी दिल्ली, 28 एप्रिल : छोट्या व्यावसायिकांचे हित लक्षात घेऊन मोदी सरकार ई-कॉमर्स कंपन्यांवर आपली पकड सतत घट्ट करताना दिसत आहे. Amazon ला गुरुवारी आणखी एक मोठा धक्का बसला. जेव्हा भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील सर्वात मोठ्या विक्रेत्यांच्या ठिकाणांवर छापे टाकले. या कारवाईचे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (CAIT) स्वागत केले आहे. Cloudtail आणि Appario वर छापा रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सीसीआयने गुरुवारी दिल्ली आणि बंगळुरूमधील क्लाउडटेल आणि अॅपेरियोच्या ठिकाणांवर छापे टाकले. अॅमेझॉनवरील एकूण विक्रीपैकी 80% क्लाउडटेल बनवते. अॅपेरियो ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक विक्री करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. CAIT शी संलग्न असलेल्या दिल्ली व्यापारी मंच या छोट्या व्यापार्‍यांच्या संघटनेने CCI कडे Amazon आणि Flipkart च्या FDI नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आणि Cloudtail आणि Appario सारख्या कंपन्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवर प्राधान्य दिल्याबद्दल तक्रार केली होती. त्यानंतर जानेवारी 2020 मध्ये आयोगाने दोन्ही कंपन्यांविरुद्ध चौकशी सुरू केली. या अनुषंगाने गुरुवारी क्लाउडटेल आणि अॅपेरियोच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. क्लाउडटेल वादात CAIT ने अनेक प्रसंगी Amazon आणि Cloudtail च्या कार्यपद्धतीवर वारंवार प्रश्न उपस्थित केले आहेत. कॅटने असा आरोप केला आहे की अॅमेझॉन आपल्या प्लॅटफॉर्मवरील इतर विक्रेत्यांपेक्षा या कंपनीला नेहमीच प्राधान्य देते. Amazon ची या कंपनीत गुंतवणूक आहे आणि त्यामुळे कंपनी FDI नियमांचे उल्लंघन करते. वास्तविक, प्रत्येक वेळी अॅमेझॉनने आपल्या प्लॅटफॉर्मवर विक्रेत्यांशी भेदभाव नाकारला आहे. 2023 पर्यंत मार्केटमध्ये येणार भारताची डिजिटल करन्सी, हा आहे सरकारचा मास्टर प्लॅन इन्फोसिसचे संस्थापक एन. नारायण मूर्ती आणि अॅमेझॉन यांच्यात करार झाल्यानंतर क्लाउडटेलची स्थापना झाली. अॅमेझॉनने क्लाउडटेलचे स्वतंत्र विक्रेता म्हणून वर्णन केले आहे. परंतु, रॉयटर्सने आपल्या एका अहवालात क्लाउडटेलच्या विस्तारात आणि कार्यामध्ये अॅमेझॉनचा मोठा हात असल्याचे उघड केले आहे. अलीकडेच अशी बातमी आली होती की अॅमेझॉन देखील क्लाउडटेलमधील मूर्तीची हिस्सेदारी विकत घेणार आहे. नारायण मूर्ती यांच्या भूमिकेचीही चौकशी व्हावी : CAIT सीसीआयने गुरुवारी छापा का टाकला, याची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही. यावर Amazon किंवा CCI यांनी कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) चे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी CCI च्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. नारायण मूर्ती यांच्या भूमिकेचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी खंडेलवाल यांनी केली. CAIT ने अॅमेझॉनवरील टॉप 20 विक्रेत्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. "रेकॉर्ड जप्त केल्याने CAIT ने Amazon आणि Appario विरुद्ध लावलेल्या आरोपांची पुष्टी होईल," असे त्यात म्हटले आहे. व्यापारी नेत्यांनी आरोप केला की किंमती आणि सवलत यामुळे भारतातील लहान किरकोळ व्यवसायांना नुकसान होत आहे. गेल्या वर्षी अॅमेझॉनने म्हटले होते की मे महिन्यापासून क्लाउडटेल विक्रेता होण्याचे थांबवेल.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Amazon

    पुढील बातम्या