भारतातील व्यापारी संघटनेचं अमेझॉनच्या बेझोसना पत्र, Future -Reliance व्यवहारात आड न येण्याचं आवाहन

भारतातील व्यापारी संघटनेचं अमेझॉनच्या बेझोसना पत्र, Future -Reliance व्यवहारात आड न येण्याचं आवाहन

अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना जाहीर पत्र (Traders Association Urges Jeff Bezos) लिहिलं आहे. एकतर आपण आमची पेमेंट्स करा किंवा आपण न्यायालयात केलेला आव्हानाचा दावा मागे घ्या,असं आवाहन या पत्रात करण्यात आलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली ०४ मार्च : रिलायन्स इंडस्ट्रीजचा भाग असलेल्या रिलायन्स रिटेल व्हेंचर्स (RRVL)या कंपनीने फ्युचर ग्रुप ही कंपनी विकत घेण्यासंबंधी ऑगस्ट 2020 मध्ये करार केला आहे. फ्युचर ग्रुपचा भाग असलेल्या फ्युचर कूपन्स कंपनीत भागीदार असूनही आपल्याला कल्पना न देताच फ्युचर ग्रुपने हा व्यवहार पक्का केल्याचं सांगत अमेझॉन कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस यांनी या व्यवहाराला न्यायालयात आव्हान दिलं आहे. या पार्श्वभूमीवर एफएमसीजी क्षेत्रातील फ्युचर ग्रुपशी संबंधित असलेल्या 6 हजारांहून अधिक व्यापारी व दुकानदारांवर देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांच्यावतीने ऑल इंडिया कंझ्युमर प्रॉडक्ट्स डिस्ट्रिब्युटर्स फेडरेशन (AICPD) आणि पब्लिक रिस्पॉन्स अगेन्स्ट हेल्पलेसनेस अँड अॅक्शन फॉर रिड्रेसल या एनजीओने अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना (Traders Association Urges Jeff Bezos) जाहीर पत्र लिहिलं आहे.

फ्युचर ग्रुपकडे आम्हा 6000 व्यापारी आणि सप्लायर्सचे सुमारे 6 हजार कोटी रुपये मार्च 2020 पासून अडकून पडले आहेत. संपूर्ण बाजारपेठेवर आपलं साम्राज्य प्रस्थापित करण्याच्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी आपण फ्युचर ग्रुप- रिलायन्स रिटेल व्हेंचर्स या कराराला न्यायालयात आव्हान दिले आहे. पण त्यामुळे आम्हा व्यापाऱ्यांचं कोलॅटरल डॅमेज होत आहे, म्हणजे आम्हाला प्रचंड मोठा आर्थिक फटका बसत आहे. आमच्या संघटनेतील सदस्यांची पेमेंट्स अडकून पडली आहेत. आमची कुटुंब प्रचंड आर्थिक तंगी, मानसिक आणि भावनिक ताणाचा सामना करत आहेत. आमच्यावर देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. हा करार झाला तर आम्हाला आमची पेमेंट्स मिळू शकतील. त्यामुळे एकतर आपण आमची पेमेंट्स करा किंवा आपण न्यायालयात केलेला आव्हानाचा दावा मागे घ्या,असं आवाहन या पत्रात करण्यात आलं आहे.

फ्युचर ग्रुप या रिटेल कंपनीने आपले रिटेल लॉजिस्टिक्स आणि वेअर हाउसिंग असेट्स रिलायन्स रिटेल व्हेंचर्सला 24 हजार 713 कोटी रुपयांना विकण्यासंबंधी कराराला ऑगस्ट 2020 मध्ये मंजुरी दिली होती.

फ्युचर ग्रुपचाच भाग असलेल्या फ्युचर कूपन्स कंपनीत अमेझॉनची 49 टक्के भागीदारी आहे त्यामुळे हा करार परस्पर केल्याचं सांगत अमेझॉनने फ्युचर-रिलायन्स कराराला न्यायालयात आव्हान दिलं आहे. अमेझॉन आणि फ्युचर ग्रुपमध्ये आधी केलेल्या कराराचं उल्लंघन करून फ्युचर ग्रुपने रिलायन्सशी करार केल्याचा दावा अमेझॉनने केला आहे. पण फ्युचर ग्रुपने मात्र हा दावा फेटाळला आहे.

First published: March 4, 2021, 4:11 PM IST

ताज्या बातम्या