मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Trade Setup : शेअर बाजार सुरु होण्याआधी या आकडेवारीवर नजर टाका, फायदा होईल

Trade Setup : शेअर बाजार सुरु होण्याआधी या आकडेवारीवर नजर टाका, फायदा होईल

12 नोव्हेंबर रोजी SENSEX 767 अंकांनी वाढून 60,686.69 वर बंद झाला. तर NIFTY 229.20 अंकांच्या वाढीसह 18,102.80 वर बंद झाला. निफ्टीने डेली चार्टवर बुलीश पॅटर्न तयार केला.

    मुंबई, 15 नोव्हेंबर : सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर 12 नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात तेजी दिसून आली. सगळीकडे खरेदीच्या आधारावर, शेवटच्या ट्रेडच्या दिवशी बाजार 1.3 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. IT, FMCG आणि Financial Services कंपन्या टॉप गेनर ठरल्या. यामध्ये 1-2 टक्के वाढ झाली. 12 नोव्हेंबर रोजी SENSEX 767 अंकांनी वाढून 60,686.69 वर बंद झाला. तर NIFTY 229.20 अंकांच्या वाढीसह 18,102.80 वर बंद झाला. निफ्टीने डेली चार्टवर बुलीश पॅटर्न तयार केला. HDFC Securities चे नागराज शेट्टी म्हणतात की, डेली चार्टवर मायनर लोअर शेड्ससह लॉन्ग बुल कँडल दिसली आहे. टेक्निकली हा पॅटर्न 18,115 वर ओव्हरहेड रेझिस्टन्स लेव्हलमधून वरचा ब्रेक आउट दर्शवत आहे. जर निफ्टीने हा 18,115 चा रेझिस्टन्स ओलांडला, तर तो 18,350 च्या पुढील टप्प्यापर्यंत जाताना दिसेल. नागराज शेट्टी पुढे म्हणाले की 12 नोव्हेंबरच्या अप-डाऊनकडे पाहता, असे दिसते की बाजाराने डेली चार्टवरील शॉर्ट टर्म निगेटिव्ह पॅटर्न नाकारला आहे. जर इथून तेजी आली तर रेझिस्टन्समधून अपसाईड ब्रेक आऊट पाहायला मिळू शकेल. यानंतर शॉर्ट टर्ममध्ये निफ्टी 18,350 च्या दिशेने जाऊ शकतो. निफ्टीला 18,000 च्या पातळीवर सपोर्ट आहे. SBI ची खास सुविधा, एटीएम कार्ड नसतानाही काढा पैसे; काय आहे प्रोसेस? गेल्या आठवड्यात मिड आणि स्मॉलकॅप शेअर्सही वाढले. मात्र दिग्गजांच्या तुलनेत त्यांची कामगिरी कमकुवत होती. गेल्या आठवड्यात निफ्टी मिडकॅप 0.45 टक्के आणि स्मॉल कॅप 0.29 टक्क्यांनी वधारला होता. राज्यातील या बँकेत खाते असेल तर तुम्हाला काढता येतील फक्त 1000 रु! हे आहे कारण  निफ्टीसाठी सपोर्ट आणि रजिस्टन्स लेव्हल निफ्टीचा पहिला सपोर्ट 17,964.8 वर आहे आणि त्यानंतर दुसरा सपोर्ट 17,826.8 वर आहे. जर निर्देशांक वरच्या दिशेने वळला तर त्याला 18,181.9 नंतर 18,261 वर रजिस्टन्स सामना करावा लागू शकतो. NIFTY BANK निफ्टी बँकेचा पहिला सपोर्ट 38,526.5 वर आहे आणि त्यानंतर दुसरा सपोर्ट 38,319.6 वर आहे. जर निर्देशांक वरच्या दिशेने वळला तर त्याला 38,881.6 आणि 39,029.8 वर रजिस्टन्सचा सामना करावा लागू शकतो.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Money, Share market

    पुढील बातम्या