Home /News /money /

Gold Price : सोन्याच्या दरात मोठी घसरण, अक्षय्य तृतीयेला खरेदीची योग्य संधी?

Gold Price : सोन्याच्या दरात मोठी घसरण, अक्षय्य तृतीयेला खरेदीची योग्य संधी?

सोन्याच्या किमती घसरण्यामागील सर्वात मोठं कारण म्हणजे अमेरिकन डॉलरची मजबूती. विविध वस्तूंच्या वाढत्या किमती, अक्षय्य तृतीया आणि लग्नसराईचा हंगाम यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याची मागणी वाढेल, असं तज्ज्ञांनी सांगितलं.

  नवी दिल्ली, 30 एप्रिल : सलग दुसऱ्या आठवड्यात सोन्याच्या किमती (Gold Price Today 30 April 2022 ) घसरल्या आहेत. एप्रिल महिन्यातली सोन्याच्या किमतीतली सप्टेंबर 2021 नंतरची ही सर्वात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर, जून कॉन्ट्रॅक्टसाठी सोन्याचा भाव शुक्रवारी 51,760 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची किंमत प्रति औंस 1895 डॉलर होती. कमोडिटी मार्केट तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या किमती घसरण्यामागील सर्वात मोठं कारण म्हणजे अमेरिकन डॉलरची मजबूती. "गेल्या आठवड्यात डॉलरचा निर्देशांक 100 च्या वर होता," असं ते म्हणाले. त्यामुळे अमेरिकन डॉलरने 20 वर्षांतील उच्चांक गाठला आहे. त्याच वेळी, फेडरल रिझर्व्ह देखील पुढील आठवड्यात व्याजदर वाढवणार आहे. त्यामुळे सोन्याची भाववाढ काहीशी थांबली आहे. हे वाचा - Business Idea: काळ्या हळदीची शेती करा, किलोला 1000 रुपये कमवून मालामाल व्हा
   विविध वस्तूंच्या वाढत्या किमती, अक्षय्य तृतीया आणि लग्नसराईचा हंगाम यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याची मागणी वाढेल, असं सोने बाजारातील तज्ज्ञांनी सांगितलं. यूएस फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपर्यंत, MCX वर सोन्याचा भाव 1870 ते 1950 डॉलर प्रति औंस आणि 50 हजार ते 53 हजार प्रति 10 ग्रॅम दरम्यान व्यवहार होण्याची अपेक्षा आहे.
  हे वाचा - LIC IPO मध्ये गुंतवणूक करताय? मग 'या' गोष्टी एकदा वाचाच
   गेल्या काही सत्रांतील घसरणीनंतर आता सोन्याचे भाव पुन्हा वाढू लागले होते. यूएस ट्रेझरी उत्पन्नात घट झाल्यामुळे शुक्रवारी सोन्याचे भाव वाढले होते. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होत आहेत. जागतिक बाजारात भाव वाढल्यामुळे शुक्रवारी सकाळी सोन्या-चांदीच्या दरात (Hike in Gold and Silver Price) मोठी उसळी पाहायला मिळाली होती. सोन्याने पुन्हा एकदा 51 चा टप्पा पार केला. तर चांदीचे दरही 64 हजारांच्या वर आहेत.
  हे वाचा - Post Office पेन्शन योजना ऑनलाइन, ग्राहकांना घरबसल्या उघडता येणार नवीन खातं
   कमोडिटी तज्ज्ञ अजय केडिया सांगतात की, गेल्या काही सत्रांतील घसरणीनंतर आता सोन्याचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होत आहेत. या संकटावर लवकर तोडगा न निघाल्यास भारतीय बाजारात सोनं 60 हजारांचा टप्पा पार करेल. मात्र, युद्ध संपल्यानंतरही रशियावरील निर्बंधांचा प्रभाव दीर्घकाळ राहील. अशा परिस्थितीत सोन्याच्या दरात जरी घसरण झाली तरी त्याची किंमत 50 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या खाली जाणार नाही.
  Published by:Digital Desk
  First published:

  Tags: Gold and silver, Gold price, Gold prices today

  पुढील बातम्या