Home /News /money /

मेकॅनिक्सच्या सन्मानार्थ आयोजित इंजिन के सुपरस्टार्स या हृदयस्पर्शी उपक्रमाविषयी सर्व काही जाणून घ्या

मेकॅनिक्सच्या सन्मानार्थ आयोजित इंजिन के सुपरस्टार्स या हृदयस्पर्शी उपक्रमाविषयी सर्व काही जाणून घ्या

इंजिन के सुपरस्टार्स सन्मान करतो मेकॅनिक्स आणि महामारीच्या काळात त्यांनी दाखवलेल्या कल्पकतेचा

    जेव्हापासून जग आणि भारताला कोविड-19ने वेढले आहे, गेल्या वर्षीच्या राष्ट्रव्यापी टाळेबंदीचा परिणाम म्हणून उद्भवलेल्या नवीन परिस्थितीची एक ठळक निशाणी म्हणजे जवळपास मोकळे झालेले रस्ते होय. या परिस्थितीने वाहनांच्या वापरकर्त्यांना उसंत घेण्यास भाग पाडले परिणामी गॅरेज मेकॅनिक्स आगामी काळात कधी या सगळ्या गोष्टी संपतील याची वाट पाहत आपल्या मार्गावर थांबले आहेत. दुसरीकडे, काही मेकॅनिक्स आपल्या कर्तव्याच्यांही पलीकडे जाऊन आपला व्यवसाय नवीन मानकांशी अत्यंत सक्षमपणे सुसंगत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या मेकॅनिक्सची आता Total Oil India आणि Network 18 समुहाने संयुक्तपणे मेकॅनिक्सच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या इंजिन के सुपरस्टार्स या उपक्रमाच्या दुसऱ्या पर्वाचे विजेते म्हणून निवड झाली आहे. लुब्रीकंट्स डिव्हिजन, Total Oil India चे CEO सय्यद शकीलूर रहमान म्हणतात, “इंजिन के सुपरस्टार्स मेकॅनिक्समध्ये असलेल्या कल्पकतेच्या प्रेरणेचा एक नमुने सादर करतो. आपण त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले पाहिजे आणि या महामारीच्या काळात घडलेल्या काही प्रेरणादायक घटना प्रकाशझोतात आणल्या पाहिजेत.” हे करताना, भारतभर एक सर्वेक्षण आयोजित करून मेकॅनिक्सचा विकास आणि अलीकडच्या वर्षांमध्ये देशासाठीच्या या एका अत्यंत खडतर काळामध्ये डिजिटल तंत्रज्ञान स्वीकारून त्यांनी एकमेकांना आणि ग्राहकांना कशी मदत केली याच्या कथा संकलित केल्या गेल्या. शकीलूर सांगतात, “या महामारीच्या काळात तंत्रज्ञानविषयक आव्हानांना चालना मिळाली आहे. आम्हाला असे कधी वाटलेही नव्हते की मेकॅनिक्स त्यांच्या मोबाईल फोन्सचा वापर इतक्या प्रभावीपणे करू शकतील. इंजिन के सुपरस्टार्स च्या माध्यमातून, लोकांच्या मनात मेकॅनिक्सविषयी कृतज्ञतेची भावना निर्माण व्हावी आणि त्यांच्या कठीण काळावर मात करण्याच्या आणि कल्पकतेच्या कथा सर्वांपर्यंत पोहचाव्यात, अशी आमची मनीषा आहे.” इंजिन के सुपरस्टार्स च्या दुसऱ्या परवाच्या विजेत्यांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी हे वाचा. 1 - फणीभूषण के, विजयवाडा फणीभूषण के यांनी आपले भाऊ आणि अन्य पाच जणांसमवेत 2004 साली आपले आऊटलेट सुरु केले. त्यांनी लगेचच 2005 साली याचा विस्तार केला आणि टाळेबंदी सुरु झाल्यानंतर कारभार सांभाळण्यासाठी 10 कर्मचाऱ्यांची नेमणूक केली. एका महिलेची कार दुरुस्त करण्यासाठी त्यांच्या आऊटलेटपासून हैदराबादपर्यंत प्रवास करून काम पूर्ण करून सदिच्छा मिळवल्याची आठवण सांगतात. ते त्यांनी बदललेल्या पूर्वीच्या प्रत्येक 7000-8000 किमी ऐवजी 15,000 किमीनंतर ऑईल बदलण्याची मुभा देणाऱ्या Total च्या सिंथेटिक ऑईलला श्रेय देतात. 2 – अमित फालडू, राजकोट, गुजरात देशभरात या महामारीमुळे टाळेबंदी लागल्यावर अमित फालडू यांची समस्या सोडवण्याची क्षमता पणाला लागली. डॉक्टर्स आणि पोलीस यांसारख्या अत्यावश्यक सेवेत असलेल्या लोकांच्या वाहनांना साहाय्य करण्यापासून ते ग्राहकांना छोट्या समस्या सोडवण्यासाठी व्हिडीओ कॉलचा वापर करणे, तसेच मोठ्या समस्या सोडवण्यासाठी व्हॉट्स अॅप ग्रुप्स तयार करणे इ. सर्व गोष्टी फालडू यांनी केल्या. इतकेच नाही तर, त्यांनी सॅनिटायझेशन स्पॉट्स उभारून आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली आणि त्यांच्या आऊटलेटच्या मागच्या बाजूला असलेल्या रिकाम्या मैदानात वाहनांना सेवा देण्यास सुरुवात केली जेणेकरून त्यांच्या कर्मचाऱ्यांना सामाजिक अंतर राखण्याची मुभा मिळाली आणि संक्रमणाची भीती नाहीशी झाली. किती अचूक निर्णय होता तो! 3 – जी राजी रेड्डी, सिकंदराबाद, तेलंगणा जी राजी रेड्डी यांनी टाळेबंदीच्या काळात वाहने नादुरुस्त होऊ लागल्याने आणि ती दुरुस्त करण्यासाठी तज्ञांची गरज असल्याने इतरांना मदत करण्यासाठी अनेक लोकांना प्रशिक्षण दिले. समस्या सोडवण्यासाठी व्हिडीओ कॉल करण्यापासून ते व्यक्तीगतरित्या समस्या सोडवण्यासाठी 150 ते 170 किमी प्रवास करण्यापर्यंत सर्व काही रेड्डी यांनी केले. आपल्या व्यवसायाच्या संभाव्यता वाढवण्यासाठी त्यांनी आपल्या ग्राहकांकडून पहिल्यापेक्षा कमी पैसे घेण्यास सुरुवात केली. 4 – विजय मंत्री, सिहोर, मध्य प्रदेश विजय मंत्री यांच्या टीमने पोलीस आणि रुग्णालयातील कर्मचारी यांसारख्या आघाडीवरील कर्मचाऱ्यांच्या गाड्यांवर काम केले. त्यांनी टाळेबंदीच्या काळात लोकांना अन्नपुरवठाही केला आणि सॅनिटायझेशन आणि मास्क वापरण्यावर भर दिला. वाहतूक करणे कठीण असताना, आणि सर्व्हिसिंगसाठी आवश्यक असणारे इंजिन ऑईल खरेदी करणे अवघड असताना मंत्री यांनी भोपाल आणि इंदोर सारख्या दूरच्या शहरात आपली खासगी व्हॅन पाठवून आपल्या आऊटलेटमध्ये सामग्री आणली. त्यांच्या मते, टाळेबंदीने त्यांना नवीन अनुभव, नवीन शिकवण आणि नवीन ग्राहक दिले. 5 – सुधींद्र टीएस, कर्नाटक सुधींद्र टीएस यांच्या टीमने टाळेबंदी दरम्यान प्रलंबित वाहनांवर काम करण्यास सुरुवात केली आणि वाहनांच्या दुरुस्तीसाठी टाळेबंदीनंतरच्या वेळा देण्यास सुरुवात केली. एक सल्लागार ग्राहकांना समस्या काय होती हे सांगेल आणि पूर्णपणे सॅनिटाईझ्ड वातावरणात केलेल्या उपायाची माहिती देतो. तसेच, त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कोविड-19 विषयी सजग करून प्रत्येक 30 मिनिटांनी सॅनिटायझर वापरण्याचे आणि अन्य काळजी घेऊनही काम सुरु करण्यापूर्वी वाहन सॅनिटाईझ करण्याचे महत्त्व बिंबवले. अपेक्षित वेळात, त्यांच्या उपक्रम आणि नियमांमुळे उलाढालीमधी वाढ झाली आणि त्यांना Engine Ke Superstar बनण्यास मदत झाली. या मेकॅनिक्सनी कसे आव्हानांना तोंड देऊन त्यांच्यावर मात केली याच्या या कथा वाचणे खरोखरच प्रेरणादायक आहे. आपला स्वतःचा जीव धोक्यात घालणे ते अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कार्य चालू ठेवण्यातही मदत करण्यापर्यंत, त्यांचे योगदान हे इंजिन के सुपरस्टार्स या उपक्रमाकडून कौतुकाची थाप मिळवण्यासाठ पात्र आहे. आपणही अशाच आव्हान स्वीकारणाऱ्या आणि इंजिन के सुपरस्टार्स अशी ओळख मिरवण्यासाठी पात्र असलेल्या मेकॅनिक्सच्या कथा पाठवू शकता. थेट या लिंक ला भेट द्या आणि आपल्या स्वतःच्या मेकॅनिकची कामगिरीच्या कथांचा प्रसार करण्यास मदत करा.
    First published:

    पुढील बातम्या