मराठी बातम्या /बातम्या /मनी /वर्षभरात अनेक IPOs मुळे गुंतवणूकदारांची जबरदस्त कमाई; काही दिवसात पैसे झाले दुप्पट

वर्षभरात अनेक IPOs मुळे गुंतवणूकदारांची जबरदस्त कमाई; काही दिवसात पैसे झाले दुप्पट

अनेक कंपन्यांचे IPO, विशेषतः टेक्नॉलॉजी स्टार्टअप्सनी बाजाराचा आलेख वर ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि शेअर बाजारातील तेजीमुळे किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये रस निर्माण झाला.

अनेक कंपन्यांचे IPO, विशेषतः टेक्नॉलॉजी स्टार्टअप्सनी बाजाराचा आलेख वर ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि शेअर बाजारातील तेजीमुळे किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये रस निर्माण झाला.

अनेक कंपन्यांचे IPO, विशेषतः टेक्नॉलॉजी स्टार्टअप्सनी बाजाराचा आलेख वर ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि शेअर बाजारातील तेजीमुळे किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये रस निर्माण झाला.

मुंबई, 27 डिसेंबर : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत, सोबतच नवीन वर्षातील नियोजनाची तयारी देखील सुरू झाली आहे. शेअर बाजाराबाबत बोलायचे तर यंदाचं वर्ष खूपच अस्थिर राहिलं. जर आपण IPO बद्दल बोलायचे झाले तर 2021 हे वर्ष विक्रमी ठरले आहे. अनेक कंपन्यांचे IPO, विशेषतः टेक्नॉलॉजी स्टार्टअप्सनी बाजाराचा आलेख वर ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि शेअर बाजारातील तेजीमुळे किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये रस निर्माण झाला.

एमटीएआर टेक्नॉलॉजीज शेअर्सने या वर्षी मार्चमध्ये बाजारात चांगली एंट्री केली. एमटीएआर टेक्नॉलॉजीजचा शेअर 575 रुपयांच्या इश्यू किंमतीपासून 291 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. सध्या हा शेअर 2231 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत आहे.

या IPOs नी जबरदस्त परतावा दिला

पारस डिफेन्सचे शेअर्स (Paras Defence Share) इश्यू किमतीपेक्षा 285 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. सध्या पारस डिफेन्सचा शेअर 734 वर ट्रेड करत आहे. पारस डिफेन्स IPO ची मूळ किंमत 165 ते 175 रुपये होती. ऑक्टोबरमध्ये या शेअरने 1198 रुपयांची विक्रमी पातळी गाठली. नुरेका (Nureca Stock Price) स्टॉक सध्या 1387 च्या पातळीवर ट्रेड करत आहे. ऑक्टोबरमध्ये या शेअरने 2100 रुपयांचा टप्पा ओलांडला होता. नुरेकाची इश्यू किंमत 396 ते 400 रुपये प्रति शेअर होती.

टॉप गेनर IPOs

लक्ष्मी ऑरगॅनिक्स स्टॉकची (Laxmi Organic Share) किंमत त्याच्या इश्यू किंमतीपेक्षा 230 टक्के, इझी ट्रिप स्टॉकची (Easy Trip Sahre) किंमत 175 टक्के, क्लीन सायन्स स्टॉकची (Clean Science Share) किंमत 167 टक्के, मॅक्रोटेक डेव्हलपर्स स्टॉक (Macritech Developers share) 153 टक्के, लेटेंट व्ह्यू अॅनालिटिक्स स्टॉकची (latent view Anlytics Share) किंमत 151 टक्के, तत्व चिंतन स्टॉकची (Tatva Chintan Share) किंमत 131 टक्के आणि नझारा टेक स्टॉकची (Nazara Tech Share) किंमत त्याच्या IPO इश्यू किंमतीपेक्षा 103र टक्के वाढली.

दरम्यान, सर्वाधिक प्रतीक्षेत असलेले शेअर्स, Zomato IPO आणि Nykaa IPO जे शानदार प्रीमियमवर लिस्टिंग झाले आहेत, सध्या त्यांच्या इश्यू किंमतीपेक्षा 56 टक्के आणि 85 टक्के वर ट्रेड करत आहेत. 2021 मध्ये, IPO मार्केटने IPO द्वारे 1,18,704 कोटी रुपये उभारले आहेत, जे मागील वर्ष 2020 मधील 26,613 कोटी पेक्षा जवळपास 4.5 पट जास्त आहे.

नवीन वर्षात अनेक आयपीओ येतील (Upcoming IPOs)

नवीन वर्ष 2022 मध्ये अनेक मोठ्या कंपन्यांचे IPO येण्याच्या तयारीत आहेत. यावर्षीप्रमाणेच नवीन वर्षातही अनेक आयपीओ अपेक्षित आहेत. प्राइम डेटाबेसनुसार, सध्या 35 कंपन्यांनी त्यांच्या IPO साठी मार्केट रेग्युलेटर (SEBI) ची मंजुरी मिळवली आहे, ज्यामध्ये सुमारे 50,000 कोटी रुपये उभारण्याचा प्रस्ताव आहे.

याशिवाय 33 कंपन्या नियामकाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. या कंपन्यांची सुमारे 60,000 कोटी रुपये उभारण्याची योजना आहे. LIC चा बहुप्रतिक्षित IPO देखील पुढील वर्षी लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.

First published:

Tags: Investment, Money, Share market