• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Top 10 निराशजन लिस्टिंग झालेले IPO, मोठ्या कंपन्यांचा समावेश

Top 10 निराशजन लिस्टिंग झालेले IPO, मोठ्या कंपन्यांचा समावेश

नोव्हेंबर 2015 मध्येही कॉफी डे एंटरप्रायझेसचा (Coffee Day Enterprises Ltd) 1,150 कोटी रुपयांचा IPO 1.81 पट सबस्क्राईब झाला होता. परंतु लिस्टिंगच्या दिवशी त्याचे मूल्य 17 टक्के कमी झाले.

 • Share this:
  मुंबई, 19 नोव्हेंबर : Paytm चा IPO लिस्टिंगच्या दिवशी गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO ठरला, परंतु IPO सब्सक्रिप्शनला मिळालेला कमी प्रतिसाद आणि हाय वॅल्युएशनमुळे शेअर बाजारात पहिल्याच दिवशी 2,150 रुपयांच्या इश्यू किमतीपासून 27 टक्क्यांनी कमी झाला. एखाद्या हाय-प्रोफाइल आयपीओच्या लिस्टिंगच्या (Paytm IPO Listing) दिवशी गुंतवणूकदारांची निराशा झाल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 2008 मध्ये रिलायन्स पॉवरच्या (Reliance Power) 10,123 कोटी रुपयांच्या आयपीओबाबत बाजारात असंच झालं होतं. गुंतवणूकदारांमध्ये असे मत होते की स्टॉक त्याच्या इश्यू किमतीच्या जवळपास दुप्पट किंमतीला लिस्टिंग होऊ शकतो. रिलायन्स पॉवरच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या किरकोळ गुंतवणूकदारांनीही त्यांची DMAC खाती उघडली. पण रिलायन्स पॉवरच्या IPO ची स्थिती देखील Paytm सारखीच होती. रिलायन्स पॉवरचा IPO 72 वेळा ओव्हर सबस्क्राईब झाला. यामुळे खूप जास्त प्रीमियमसह शेअर बाजारात लिस्ट होऊ शकेल असं अनेकांचे मत होते. पण तसे काही झाले नाही. रिलायन्स पॉवरचा स्टॉक नाममात्र प्रीमियमवर लिस्ट झाला आणि त्यानंतर लगेचच त्याची किंमत 17 टक्के कमी झाली. हा शेअर पहिल्या दिवशी 372 रुपयांवर बंद झाला आणि तेव्हापासून तो कधीही त्याच्या इश्यू किमतीच्या जवळपास पोहोचू शकला नाही. घरी आहे लगीनघाई तर स्वस्तात करा सोनेखरेदी! 3000 रुपयांनी कमी आहे सोन नोव्हेंबर 2015 मध्येही कॉफी डे एंटरप्रायझेसचा (Coffee Day Enterprises Ltd) 1,150 कोटी रुपयांचा IPO 1.81 पट सबस्क्राईब झाला होता. परंतु लिस्टिंगच्या दिवशी त्याचे मूल्य 17 टक्के कमी झाले. एप्रिल 2018 मध्ये ICICI सिक्युरिटीजच्या IPO ला देखील गुंतवणूकदारांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला, शेवटच्या दिवसापर्यंत फक्त 78 टक्के सबस्क्रिप्शन झाले. कमी सबस्क्रिप्शनमुळे, कंपनीने IPO चा आकार कमी करून 3,500 कोटी रुपये केला आणि त्याची किंमत प्रति शेअर 520 रुपये केली. शेवटच्या दिवशी, अँकर गुंतवणूकदारांची सबस्क्रिप्शन 87.9 टक्क्यांवर पोहोचली. असे असूनही, त्याचे शेअर्स 16 टक्के डिस्काउंटसह लिस्टिंग झाले आहेत. Paytm च्या शेअर्समुळे गुंतवणूकदार पहिल्या दिवशी निराश; पुढे काय करायचं आजवरच्या मोठ्या IPO ची निराशाजन लिस्टिंग
  कंपनी ऑफर प्राइस (रुपये) आईपीओ साइज (कोटी) लिस्टिंग डेट लिस्टिंग प्राईज नुकसान (टक्के)
  1 कॉफी एंटरप्राइजेज लिमिटेड 328.00 1,150.00 02-11-2015 270.15 -17.34
  2 रिलायंस पावर लिमिटेड 450.00 10,123.20 11-02-2008 372.50 -17.22
  3 ICICI सिक्योरिटीज लिमिटेड 520.00 3,480.12 04-04-2018 445.05 -14.41
  4 केयर्न इंडिया लिमिटेड 160.00 5,788.79 09-01-2007 137.50 -14.06
  5 UTI एसेट मैनेजमेंट 554.00 2,159.88 12-10-2020 476.60 -13.97
  6 कल्यान ज्वेलर्स इंडिया लि. 87.00 1,174.82 26-03-2021 75.30 -13.45
  7 भारती इंफ्राटेल लिमिटेड 220.00 4,172.76 28-12-2012 191.20 -13.09
  8 इंडियाबुल्स पावर लिमिटेड 45.00 1,758.15 30-10-2009 39.25 -12.78
  9 ICICI प्रूडेंशियल लाइफ इंश्योरेंस 334.00 6,056.79 29-09-2016 297.65 -10.88
  10 JAYPEE इंफ्राटेक लिमिटेड 102.00 2,257.61 21-05-2010 91.30 -10.49
  Published by:Pravin Wakchoure
  First published: