3 दिवसांनंतर डिझेल स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर

3 दिवसांनंतर डिझेल स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल, जाणून घ्या काय आहेत आजचे दर.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर: पेट्रोलचे दर स्थिर तर डिझेलच्या दरात तीन दिवसांनंतर घसरण झाली आहे. डिझेल तीन दिवसांनंतर स्वस्त झालं मात्र पेट्रोलचे दर कमी कधी होणार याकडे सर्वसामान्य नागरिकांचे डोळे लागले आहेत. 4 दिवसांपासून पेट्रोलचे दरच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही तर डिझेल तीन दिवसांनंतर स्वस्त झालं आहे. शुक्रवारी जवळपास 10 ते 11 पैसे प्रतिलिटर डिझेलची किंमत कमी झाली आहे. दिल्ली आणि कोलकाता इथे 10 पैसे प्रतिलिटरने डिझेलची किंमत कमी झाली. तर मुंबई आणि चेन्नईमध्ये 11 पैसे लिटर डिझेल स्वस्त झालं आहे.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळालेल्या माहितीनुसार असे आहेत पेट्रोल आणि डिझेलचे दर

दिल्ली- पेट्रोल 73.27, डिझेल- 66.31

कोलकाता- पेट्रोल 75.92, डिझेल 68.67

मुंबई- पेट्रोल 78.88, डिझेल 69.50

चेन्नई- पेट्रोल 76.09, डिझेल 70.04

अशी बदलते पेट्रोलची किंमत जाणून घ्या.

पेट्रोल-डिझेलचे दर दर दिवशी बदलत असल्यानं रोजच्या दराबाबत नागरिकांना उत्सुकता असते. मात्र तुम्हाला माहीत आहे का? पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज सकाळी 6 वाजता बदलतात. म्हणजे बदललेला रेट काय आहे हे तुम्हाला सकाळी 6 वाजता समजतं. पेट्रोल आणि डिझेलमध्ये डीलर कमीशन, एक्साइज ड्युटी आणि इतर कर सामावून त्याची किंमत दुप्पट होत असते. त्यामुळे सर्व पेट्रोल पंपावर 6 वाजता हे दर बदलले जातात.

SMS वर तुम्ही पाहू शकता इंधनाचे दर

रोज बदलणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेण्यासाठी प्रशासनाने एक सुविधा उपलब्ध केली आहे. यामध्ये तुमच्या शहरात इंधनाचे दर काय आहेत हे जाणून घेण्यासाठी डिलर किंवा व्यापाऱ्यांसाठी इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड> 92249 9 2249 या नंबरवर मेसेज करू शकतात. ग्राहकांसाठी एचपीसीएल ग्राहक कोड HPPRICE<डीलर कोड> 9222201122 या नंबरवर मेसेज केल्यानंतर तुमच्या शहरातील लेटेस्ट इंधनाचे दर समजण्यास मदत होऊ शकते.

EXCLUSIVE VIDEO: काँग्रेस उमेदवाराच्या बाऊन्सरचं फोटोशूट वादात, पोलिसांच्या स्टेंनगण घेऊन दिल्या पोज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 18, 2019 10:33 AM IST

ताज्या बातम्या