बजेटच्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ, शनिवारचे दर इथे पाहा

बजेटच्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ, शनिवारचे दर इथे पाहा

बजेटच्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावात (Gold-Silver Prices Today) दमदार वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. मोदी सरकारकडून आपल्या कार्यकाळातील दुसरं बजेट निर्मला सीतारामन यांनी सादर केलं. त्याचदरम्यान सोन्या-चांदीला झळाळी मिळाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2020-21 या वर्षाचा अर्थसंकल्प (Budget 2020) मांडला. बजेटच्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावात (Gold-Silver Prices Today) दमदार वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. आज दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत (Gold Prices) प्रति तोळा 277 रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्यासोबतच चांदीचे दरही (Silver Prices) वाढलेत. प्रति किलो चांदीच्या किंमतीत 483 रुपयांची वाढ झाली आहे. मोदी सरकारकडून आपल्या कार्यकाळातील दुसरं बजेट निर्मला सीतारामन यांनी सादर केलं. त्याचदरम्यान सोन्या-चांदीला झळाळी मिळाली आहे.

शनिवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याची किंमत प्रति तोळा 41 हजार 646 रुपयांवरुन 41 हजार 923 रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या 3-4 दिवसांमध्ये सोन्याच्या भावात मोठा चढउतार पाहायला मिळाला. शुक्रवारी सोन्याचे भाव प्रति तोळा 131 रुपयांनी घटले होते. तर गुरुवारी सोन्याच्या दरात प्रति तोळा 400 रुपयांची वाढ झाली होती.

(हेही वाचा : तुम्हाला किती कर द्यावा लागेल? Tax Calculator वापरून काढा कराची रक्कम )

सोन्याबरोबर चांदीच्या किंमतीतही आज मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली. चांदीची किंमत प्रति किलो 47 हजार 613 रुपयांवरुन 48 हजार 096 रुपयांपर्यंत वाढली आहे. HDFC सिक्युरीटीजच्या तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार आंतराराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे याचा परिणाम सोन्याच्या खरेदीवर झाला आहे.

अन्य बातम्या

Budget 2020: मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मेगाप्लॅन, 16 कलमी कार्यक्रम

Budget 2020 : वीज मीटर होणार 'प्रीपेड', रिचार्ज केल्यानंतर मिळणार वीज

Budget 2020 : या अर्थसंकल्पात उत्पन्न आणि रोजगारावर भर - पंतप्रधान नरेंद्र मोदी

First published: February 1, 2020, 6:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या