अंड्याच्या किंमतींनी रचला रेकॉर्ड! आज देशभरात सर्वाधिक दराने होतेय विक्री

अंड्याच्या किंमतींनी रचला रेकॉर्ड! आज देशभरात सर्वाधिक दराने होतेय विक्री

कोरोना-लॉकडाऊन आणि मार्केट स्ट्रॅटजीमुळे बाजारात अंड्यांच्या किंमतींनी नवा रेकॉर्ड बनवला आहे. आज बाजारात सर्वाधिक दराने अंड्याची विक्री केली जात

  • Share this:

नवी दिल्ली, 26 डिसेंबर: कोरोना-लॉकडाऊन आणि मार्केट स्ट्रॅटजीमुळे बाजारात अंड्यांच्या किंमतींनी नवा रेकॉर्ड बनवला आहे. आज बाजारात सर्वाधिक दराने अंड्याची विक्री  केली जात आहे. देशभरातील विविध शहरांमध्ये अंड्यांच्या किंमतींनी उच्चांक गाठला आहे.

लखनऊमध्ये अंड्यांची घाऊक किंमत 617 रुपये प्रति शेकडावर पोहोचली आहे. तर पाटणामध्ये 586, सूरतमध्ये 575 आणि दिल्लीत 571 रुपयांवर हा दर पोहोचला आहे. देशातील सर्वात मोठ्या अंडी बरवाला या बाजारात अंड्यांची किंमत 550 रुपये शेकडा दराने विकली जात आहेत. बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर जानेवारीचा संपूर्ण महिना हा हंगामाचा असेल त्यामुळे अंड्यांच्या किंमती आणखी वाढू शकतात.

अंड्याच्या बाजारावर कोरोना-लॉकडाऊनमुळे असा होतोय परिणाम

न्यूज18 हिंदीने पोल्ट्री फॉर्म मालक अनिल यांच्या हवाल्याने अशी माहिती दिली आहे की, आजचे अंड्याचे भाव सर्वाधिक आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, कोरोनामुळे हजारो कोंबड्या जमिनीत जिवंत गाडण्यात आल्या आहेत. अंडी आणि कोंबड्या जमिनीमध्ये दडपली गेली, कुणी फ्रीमध्ये घेणाराही नव्हता. अशा परिस्थितीत जेव्हा कोंबड्यांचे अंडे विकले जात नव्हते तर पोल्ट्रीवाले किती दिवस कोंबड्यांना पोसणार होते? त्यानंतर , वाहतूक बंद झाल्यामुळे त्यांच्यासाठी धान्यही उपलब्ध होत नव्हतं. जे मिळत होतं, ते खूप महाग होतं. कोरोना-लॉकडाऊनमध्ये सुमारे 60 टक्के कोंबडी मारली गेली. आता अंड देणाऱ्या कोंबड्या जास्त आहेत, पण अंड्याची मागणी वाढली आहे.

(हे वाचा-व्यावसायिकांची सीतारामन यांना साद, ITR भरण्याची तारीख पुढे ढकलण्याची मागणी)

जाणकारांच्या मते ही मार्केट स्टॅटजी आहे

हरियाणा राज्यात असणाऱ्या बरवाला बाजारात अशी बातमी पसरली होती की, याठिकाणी कोंबड्यांमध्ये  आरडी नावाचा आजार आहे. या आजारात कोंबड्यांना मोल्डिंगवर ठेवले जाते. हा 10 ते 15 दिवसांचा कालावधी असतो. या दरम्यान कोंबड्या अंडी देत नाहीत. या दरम्यान कोंबड्या केवळ औषधांवर असतात. त्यांना दाणे देखील जवळपास दिले जात नाहीत. ज्यामुळे अंड्याचं उत्पादन कमी होतं. मात्र जाणकारांच्या मते ही केवळ एक अफवा आहे. ज्याठिकामी 300 ते 350 फार्म आहेत तिथे एक दोन फार्ममध्ये  आरडीचा आजार असणे सामान्य आहे. 

Published by: Janhavi Bhatkar
First published: December 26, 2020, 4:45 PM IST
Tags: foodmoney

ताज्या बातम्या