खूशखबर! पेट्रोल झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

Petrol, Diesel - पेट्रोल-डिझेलच्या आजच्या किमती काय आहेत, ते घ्या जाणून

News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2019 11:17 AM IST

खूशखबर! पेट्रोल झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

मुंबई, 01 ऑगस्ट : कालच्याप्रमाणे आजही पेट्रोलचा दर कमी झालाय. तुम्हाला आता पेट्रोल खरेदी करताना कमी पैसे द्यावे लागतील. डिझेलची किंमत मात्र स्थिर राहिलीय. जाणून घेऊ महानगरातल्या पेट्रोल-डिझेलच्या किमती-

दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्यात. पेट्रोल 6 पैशांनी स्वस्त होऊन 72.80 रुपये प्रति लीटर झालंय. डिझेलचा 66 रुपये प्रति लीटर भाव तेवढाच आहे. मुंबईत पेट्रोल 6 पैसे स्वस्त झालंय. ते आता 78.42 रुपये प्रति लीटर झालंय. तर डिझेल 69.17 रुपये प्रति लीटर आहे.

'या' गोष्टी आजपासून होणार 'स्वस्त', कुठल्या व्यवहारांमध्ये वाचणार पैसे?

कोलकत्त्यात पेट्रोल 75.44 रुपये प्रति लीटर झालंय. चेन्नईत पेट्रोल 75.60 रुपये प्रति लीटर झालंय. दोन्हीकडे डिझेलचे भाव अगोदरचेच आहेत.

असे पाहा पेट्रोलचे दर

Loading...

पेट्रोलचे दर जाणून घेण्यासाठी SMS करता येतो. इंडियन ऑयल ग्राहक RSP-डीलर कोड-92249 9 2249 वर मेसेज करू शकतो. बीपीसीएल  RSP-डीलर कोड- 9223112222 वर मेसेज करू शकतो. एचपीसीएल ग्राहक HPPRICE-डीलर कोड- 9222201122 इथे मेसेज करू शकतो.

या ऑइल कंपन्यांचे अॅपही आहेत. त्यामार्फतही पेट्रोल - डिझेलचे भाव कळू शकतात. इंडियन ऑयलचं Fuel@IOC, बीपीसीएल ग्राहक SmartDrive अॅप, तर एचपीसीएलचं My HPCL अशी अॅप्स आहेत.

सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, 'हे' आहेत बुधवारचे दर

याशिवाय ऑइल कंपन्यांच्या वेबसाइट्स आहेत. इंडियन ऑयलचीवेबसाइट www.iocl.com, बीपीसीएलची वेबसाइट www.bharatpetroleum.com, एचपीसीएलची  www.hindustanpetroleum.com इथेही तुम्हाला रोजचे दर कळू शकतात.

सकाळी 6 वाजता ठरतात दर

सरकार ऑइल मार्केटिंग कंपनी ( HPCL, BPCL, IOC ) रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. त्याबरोबर आंतरराष्ट्रीय पेट्रोल-डिझेलच्या किमतींचाही विचार केला जातो.

कार खरेदी करताय? मग सरकारनं बदललेले हे नियम पाहाच

पेट्रोल जीएसटीच्या कक्षेत आलं तर काय होईल ?

पेट्रोलची जेवढी किंमत असते तेवढाच कर त्यावर भरावा लागतो. कच्चं तेल खरेदी केल्यानंतर ते रिफायनरीमध्ये नेलं जातं आणि नंतर शुद्ध झालेलं पेट्रोल मिळतं. अशा पेट्रोल आणि डिझेलवर कर द्यावा लागतो. सगळ्यात पहिल्यांदा सरकार अबकारी कर लावतं. त्यानंतर त्या त्या राज्यांतही कर लावला जातो. त्याला सेल्स टॅक्स किंवा व्हॅट म्हटलं जातं.

हे सगळे कर लागल्यानंतर पेट्रोल पंपाचा डीलर त्यावर आपलं कमिशन जोडतो. काही ठिकाणी उत्पादन शुल्काशिवाय अतिरिक्त करही लावला जातो. या सगळ्या करांमुळे राज्यांची कमाई वाढते.

पेट्रोल - डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणलं तर ते सामान्य माणसाच्या हिताचं ठरेल पण यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचं नुकसान होऊ शकतं.

VIDEO: नवनीत राणांचा नवा अवतार, पेरणीनंतर आता फवारणी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: petrol
First Published: Aug 1, 2019 11:17 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...