• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Petrol-Diesel Price today: पेट्रोल-डिझेल नवे दर जारी, इथे तपासा तुमच्या शहरातील आजचा भाव

Petrol-Diesel Price today: पेट्रोल-डिझेल नवे दर जारी, इथे तपासा तुमच्या शहरातील आजचा भाव

सरकारी तेल कंपन्यांनी आज बुधवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Price) कोणतीही वाढ केलेली नाही. आज इंधन दर स्थिर आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : सप्टेंबर महिन्यापासून पेट्रोल-डिझेल दरात सतत वाढ होत आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज बुधवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Price) कोणतीही वाढ केलेली नाही. आज इंधन दर स्थिर आहे. राजधानी दिल्लीत आज पेट्रोल 104.44 रुपये प्रति लीटर आहे. तर डिझेल 93.18 रुपये प्रति लीटर आहे. रविवारी पेट्रोलचा भाव 30 पैसे प्रति लीटरने वाढला होता. तर डिझेल दर 35 पैसे प्रति लीटरने महागलं होतं. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती या महिन्याच्या सुरुवातीपासून दररोज वाढत्या होत्या. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या 10 दिवसांत पेट्रोल 2.80 रुपयांनी महागलं, तर डिझेल किंमतीत 3.30 रुपयांची वाढ झाली. चार महानगरातील पेट्रोल डिझेल भाव (Petrol Diesel Price on 13 October 2021) - >> दिल्ली पेट्रोल 104.44 रुपये आणि डिझेल 93.17 रुपये प्रति लीटर >> मुंबई पेट्रोल 110.41 रुपये आणि डिझेल 101.03 रुपये प्रति लीटर >> चेन्नई पेट्रोल 101.79 रुपये आणि डिझेल 97.59 रुपये प्रति लीटर >> कोलकाता पेट्रोल 105.09 रुपये आणि डिझेल 96.28 रुपये प्रति लीटर देशभरात जवळपास 26 राज्यात पेट्रोलचा दर 100 रुपयांवर पोहोचला आहे. यात मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लडाख सामिल आहे. त्याशिवाय महानगरात मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये पेट्रोल आधीपासूनच 100 रुपये प्रति लीटरवर पोहोचलं आहे. मुंबईत पेट्रोलचा दर सर्वाधिक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने देशात पेट्रोल-डिझेल दरात वाढ होत आहे.

    LPG Latest Price: केवळ 634 रुपयांत मिळेल घरगुती गॅस सिलेंडर, वाचा सविस्तर

    देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. तसंच मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Karishma
    First published: