पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, 'या' आहेत आजच्या किमती

Petrol, Diesel - पेट्रोल-डिझेलच्या किमती आज एकदम कमी झाल्यात. पाहा आजचे दर

News18 Lokmat | Updated On: Jul 30, 2019 11:05 AM IST

पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, 'या' आहेत आजच्या किमती

मुंबई, 30 जुलै : तुम्ही आजच कार,बाइकमध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरून घ्या. कारण आज ( 29 जुलै ) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात  घसरण झालीय. कालही पेट्रोल-डिझेल स्वस्त झालं होतं. तसंच आजही आहे. जाणून घेऊ आजचे दर.

दिल्लीत पेट्रोलची किंमत 13 पैशांनी कमी झालीय. तिथे आता पेट्रोल 72.86 रुपये प्रति लीटर मिळतंय. तर डिझेल 7 पैशांनी कमी झालंय. ते 66 रुपये प्रति लीटर मिळतंय. मुंबईत पेट्रोल 13 पैशांनी कमी होऊन एका लीटरला 78.48 रुपये मिळतंय. तर डिझेल 8 पैशांनी कमी झालंय. ते 69.17 रुपये प्रति लीटर मिळतंय.

3 लाख सरकारी कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 'इथे' होणार नोकरकपात

कोलकत्त्यात पेट्रोल 75.50 रुपये आणि डिझेल 68.19 रुपये प्रति लीटर मिळतंय. तर चेन्नईत पेट्रोल 75.66 रुपये आणि डिझेल 69.71 रुपये प्रति लीटर मिळतंय.

असे पाहा पेट्रोलचे दर

Loading...

पेट्रोलचे दर जाणून घेण्यासाठी SMS करता येतो. इंडियन ऑयल ग्राहक RSP-डीलर कोड-92249 9 2249 वर मेसेज करू शकतो. बीपीसीएल  RSP-डीलर कोड- 9223112222 वर मेसेज करू शकतो. एचपीसीएल ग्राहक HPPRICE-डीलर कोड- 9222201122 इथे मेसेज करू शकतो.

इन्कम टॅक्स रिटर्न भरताय? मग 'ही' काळजी घ्यायलाच हवी

या ऑइल कंपन्यांचे अॅपही आहेत. त्यामार्फतही पेट्रोल - डिझेलचे भाव कळू शकतात. इंडियन ऑयलचं Fuel@IOC, बीपीसीएल ग्राहक SmartDrive अॅप, तर एचपीसीएलचं My HPCL अशी अॅप्स आहेत.

याशिवाय ऑइल कंपन्यांच्या वेबसाइट्स आहेत. इंडियन ऑयलचीवेबसाइट www.iocl.com, बीपीसीएलची वेबसाइट www.bharatpetroleum.com, एचपीसीएलची  www.hindustanpetroleum.com इथेही तुम्हाला रोजचे दर कळू शकतात.

रोज करा 40 रुपयांची बचत आणि 'अशा' प्रकारे मिळवा 8 लाख

सकाळी 6 वाजता ठरतात दर

सरकार ऑइल मार्केटिंग कंपनी ( HPCL, BPCL, IOC ) रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. त्याबरोबर आंतरराष्ट्रीय पेट्रोल-डिझेलच्या किमतींचाही विचार केला जातो.

VIDEO: मुंबईकरांनो वेळीच घरी पोहोचा, हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: petrol
First Published: Jul 30, 2019 11:05 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...