सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ, हे आहेत आजचे दर

सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ, हे आहेत आजचे दर

सोन्याच्या दरात विक्रमी वाढ सुरूच आहे. सोन्याच्या दरात 150 रुपयांची वाढ होऊन आता हा दर 38 हजार 970 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या किंमतीत 60 रुपयांची वाढ होऊन हा दर 45 हजार 100 प्रतिकिलो झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 22 ऑगस्ट : सोन्याच्या दरात विक्रमी वाढ सुरूच आहे. सोन्याच्या दरात 150 रुपयांची वाढ होऊन आता हा दर 38 हजार 970 रुपयांवर पोहोचला आहे. अखिल भारतीय सराफा संघाच्या म्हणण्यानुसार, रुपया कमकुवत झाल्याने सोन्याला चांगली मागणी आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात चांगली वाढ झाली आहे.

याबरोबरच चांदीच्या किंमतीत 60 रुपयांची वाढ होऊन हा दर 45 हजार 100 प्रतिकिलो झाला आहे. चांदीच्या नाण्यांना वाढती मागणी असल्यामुळे चांदीच्या दरात ही वाढ होताना दिसते आहे.

का वाढले सोन्याचे भाव ?

1. जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी आल्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचं प्रमाण वाढलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि वर्ल्ड बँकच्या अहवालात जागतिक स्तरावर आर्थिक वाढ खुंटल्याचं नमूद केलं आहे. त्यामुळे लोक सोन्यामधल्या गुंतवणुकीवर अवलंबून आहेत.

2. रिझर्व्ह बँकेने सोन्याची खरेदी वाढवली आहे. जगभरातल्या देशांच्या केंद्रीय बँका पुढच्या काही महिन्यांत 374 मेट्रिक टन सोन्याची खरेदी करतील, असा अंदाज आहे. RBI ने मार्च 2018 पासून आतापर्यंत 60 टन सोन्याची खरेदी केली आहे. ही मागणी वाढल्यामुळे सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली.

शेअर बाजार आणि FD ऐवजी इथे गुंतवा पैसे, मिळेल बंपर नफा

3. अमेरिकेने गेल्या 11 वर्षांत पहिल्यांदाच व्याजदरात कपात केली आहे. जेव्हाजेव्हा अमेरिका व्याजदरात कपात करते तेव्हा सोन्याचे भाव वाढतात, असा ट्रेंड आहे. आत्ताही तसंच चित्र पाहायला मिळालं.

4. अमेरिका आणि चीनमधल्या व्यापारयुद्धाचा जगालाच फटका बसला आहे. जागतिक स्तरावर व्यापार मंदावला असल्यामुळे आशियाई देशातलं चलन कमकुवत झालं आहे. त्यामुळे सोन्याला मागणी वाढली.

5. अमेरिका आणि इराणमध्येही तणाव निर्माण झालाय. अशा स्थितीत लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यावर भर देत आहेत.

======================================================================================================

VIDEO : सत्यनारायणाची पूजा होती का? अंजली दमानियांचा राज ठाकरेंना टोला

First published: August 22, 2019, 7:34 PM IST
Tags: goldmoney

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading