सोन्याची खरेदी झाली महाग, जाणून घ्या मंगळवारचे दर

Gold, Silver - सोन्या-चांदीची खरेदी करणार असाल, तर थोडी वाट पाहा. सोनं महाग झालंय. पाहा नवे दर

News18 Lokmat | Updated On: Jul 30, 2019 06:40 PM IST

सोन्याची खरेदी झाली महाग, जाणून घ्या मंगळवारचे दर

मुंबई, 30 जुलै : आंतरराष्ट्रीय स्तरावर आज मंगळवारी सोन्याची किंमत स्थिर राहिलीय. पण दिल्ली सराफा बाजारात सोन्यात 160 रुपयांची वृद्धी पाहायला मिळालीय. सोनं 35,880 रुपये प्रति 10 ग्रॅम भाव झालंय. चांदीची मागणी वाढल्यानं चांदी 150 रुपयांनी वाढलीय. चांदी आता 42,050 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. व्यापाऱ्यांच्या मते सोन्या-चांदीला घरगुती बाजारात मागणी वाढलीय. त्यामुळे भाव वाढले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयाॅर्कमध्ये सोनं 1,427.60 डॉलर आणि चांदी 16.54 डॉलर प्रति औंस झालीय. अमेरिकन फेडरल रिझर्व्हची बैठक, अमेरिका-चीनच्या ट्रेड संबंधी बातम्या यामुळे गुंतवणूकदारांचा रोख सावध होता.

Paytm सुरू करतेय नवी सेवा, घरबसल्या कमावू शकाल पैसे

सोन्याचा भाव

दिल्लीत 99.9 टक्के शुद्ध सोन्याची किंमतीत 160 रुपयांनी वाढून 35,880 रुपये झालीय. तर 99.5 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 35,710 रुपये प्रति 10 ग्रॅम झालीय. गिन्नी सोन्याची किंमत 27,500 रुपये प्रति 8 ग्रॅमवर स्थिर राहिलीय.

Loading...

LICच्या या स्कीममध्ये 5 लाख रुपये गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा महिना 8 हजार

चांदी 150 रुपयांनी वाढली

चांदीचा भाव 150 रुपयांनी वाढून 42,050 रुपये आणि साप्ताहिक डिलिवरीवाल्या चांदीचा भाव 53 रुपयांनी वाढून 41,239 रुपये प्रति किलोग्रॅम झाला. चांदीच्या नाण्यांना चांगली मागणी आहे. चांदीचा दर 1000 रुपये प्रति शेकडा वाढलाय. चांदीचा लिवाली भाव 85,000 रुपये आणि बिकवाली भाव 86,000 रुपये प्रति शेकडा राहिला.

राज्य सरकारची नवी योजना, 10 लाख नोकऱ्या होणार उपलब्ध

पुढील काही महिन्यात म्हणजेच दिवाळीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर 1 हजार 500 डॉलरवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेतील दरांवर होऊ शकतो. त्यामुळे देशातील सोन्याचा दर दिवाळीपर्यंत 36 हजारच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर चांदीचे दर 42 हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरावर फेडरल रिझर्व्ह बँकेचे व्याज दर, अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेला तणाव या सर्व गोष्टींचा परिणाम होऊ शकतो असं जाणकारांचं मत आहे.

VIDEO : पावसामुळे रस्ता झाला निसरडा, एसटी बस पलटली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: gold
First Published: Jul 30, 2019 06:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...