पुन्हा पेट्रोलचे दर झाले कमी, 'हे' आहेत आजचे भाव

पुन्हा पेट्रोलचे दर झाले कमी, 'हे' आहेत आजचे भाव

Petrol, Diesel - पेट्रोल-डिझेलच्या आजच्या किमती काय आहेत, ते घ्या जाणून

  • Share this:

मुंबई, 02 ऑगस्ट : आज शुक्रवारी पेट्रोलच्या दरात घट झालीय. आता पेट्रोल खरेदी करण्यासाठी तुम्हाला कमी पैसे द्यावे लागतील. डिझेलची किंमत स्थिर आहे. त्यात बदल झालेला नाही.  दिल्लीत पेट्रोल 11 पैसे स्वस्त होऊन 72.69 रुपये प्रति लीटर झालंय. तर दिल्लीत डिझेलचा जुना भाव 66 रुपयेच प्रति लीटर आहे. मुंबईत पेट्रोल 8 पैसे स्वस्त झालंय. आता इथे पेट्रोलची किंमत 78.34 रुपये प्रति लीटर आहे. तर डिझेल 69.17 रुपये प्रति लीटर कायम आहे.

कोलकत्तामध्ये पेट्रोल 7 पैसे स्वस्त झालंय. त्याची किंमत 75.37 रुपये प्रति लीटर झालीय. डिझेलचा भाव जुनाच म्हणजे 68.19 रुपये प्रति लीटर आहे. चेन्नईत पेट्रोलची किंमत 8 पैसे स्वस्त होऊन 75.52 रुपये प्रति लीटर आहे. तर डिझेलच्या किमतीत बदल न झाल्यानं त्याची किंमत 69.71 रुपये प्रति लीटर आहे.

IIPS च्या प्रोजेक्ट ऑफिसरसाठी भरती, 'असा' करा अर्ज

असे पाहा पेट्रोलचे दर

पेट्रोलचे दर जाणून घेण्यासाठी SMS करता येतो. इंडियन ऑयल ग्राहक RSP-डीलर कोड-92249 9 2249 वर मेसेज करू शकतो. बीपीसीएल  RSP-डीलर कोड- 9223112222 वर मेसेज करू शकतो. एचपीसीएल ग्राहक HPPRICE-डीलर कोड- 9222201122 इथे मेसेज करू शकतो.

या ऑइल कंपन्यांचे अॅपही आहेत. त्यामार्फतही पेट्रोल - डिझेलचे भाव कळू शकतात. इंडियन ऑयलचं Fuel@IOC, बीपीसीएल ग्राहक SmartDrive अॅप, तर एचपीसीएलचं My HPCL अशी अॅप्स आहेत.

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची पहिली पसंत लंडन, 'हे' आहे मुंबईचं स्थान

याशिवाय ऑइल कंपन्यांच्या वेबसाइट्स आहेत. इंडियन ऑयलचीवेबसाइट www.iocl.com, बीपीसीएलची वेबसाइट www.bharatpetroleum.com, एचपीसीएलची  www.hindustanpetroleum.com इथेही तुम्हाला रोजचे दर कळू शकतात.

सकाळी 6 वाजता ठरतात दर

सरकार ऑइल मार्केटिंग कंपनी ( HPCL, BPCL, IOC ) रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. त्याबरोबर आंतरराष्ट्रीय पेट्रोल-डिझेलच्या किमतींचाही विचार केला जातो.

घर खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर! HDFC नं कमी केले व्याजदर, 'इतकं' स्वस्त EMI

पेट्रोल जीएसटीच्या कक्षेत आलं तर काय होईल ?

पेट्रोलची जेवढी किंमत असते तेवढाच कर त्यावर भरावा लागतो. कच्चं तेल खरेदी केल्यानंतर ते रिफायनरीमध्ये नेलं जातं आणि नंतर शुद्ध झालेलं पेट्रोल मिळतं. अशा पेट्रोल आणि डिझेलवर कर द्यावा लागतो. सगळ्यात पहिल्यांदा सरकार अबकारी कर लावतं. त्यानंतर त्या त्या राज्यांतही कर लावला जातो. त्याला सेल्स टॅक्स किंवा व्हॅट म्हटलं जातं.

हे सगळे कर लागल्यानंतर पेट्रोल पंपाचा डीलर त्यावर आपलं कमिशन जोडतो. काही ठिकाणी उत्पादन शुल्काशिवाय अतिरिक्त करही लावला जातो. या सगळ्या करांमुळे राज्यांची कमाई वाढते.

पेट्रोल - डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणलं तर ते सामान्य माणसाच्या हिताचं ठरेल पण यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचं नुकसान होऊ शकतं.

SPECIAL REPORT: भाजपचं 36/0 टार्गेट तर मुंबई काँग्रेसचे नेते दांडीबहाद्दर!

Published by: Sonali Deshpande
First published: August 2, 2019, 11:04 AM IST
Tags: petrol

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading