पेट्रोलच्या दरातली घसरण सुरूच, 'हे' आहेत आजचे दर

पेट्रोलच्या दरातली घसरण सुरूच, 'हे' आहेत आजचे दर

Petrol, Diesel - पेट्रोल-डिझेलचे दर कमी झालेत. तुमच्या शहरातले दर जाणून घ्या

  • Share this:

मुंबई, 09 ऑगस्ट : कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानं गेले 15 दिवस पेट्रोलच्या किमतींची घसरण झालीय. या काळात पेट्रोल 1.25 रुपये लीटर स्वस्त झालंय. शुक्रवारी पेट्रोलच्या किमतीत 14-16 पैसे प्रति लीटर घट झालीय. तर डिझेलचा दर 7-13 पैसे कमी झालाय. काल गुरुवारी पेट्रोलच्या दरात 5 पैसे आणि डिझेलच्या दरात 6 पैसे घसरण आली होती.

महानगरांमधले पेट्रोल-डिझेलचे भाव

शुक्रवारी ( 9 ऑगस्ट ) दिल्लीत पेट्रोल 72.08 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 65.75 रुपये प्रति लीटर आहे. कोलकत्ता, मुंबई आणि चेन्नई इथे पेट्रोलचे दर 74.74 रुपये, 77.74 रुपये आणि 74.88 रुपये प्रति लीटर झालेत. डिझेलमध्ये दुसऱ्या दिवशी 7 पैशापासून 13 पैशापर्यंत घट झालीय. तीन महानगरांमध्ये कोलकत्ता, मुंबई आणि चेन्नई इथे डिझेल क्रमश: 68.08 रुपये, 68.94 रुपये आणि 69.48 रुपये प्रति लीटर आहे.

LIC मध्ये नोकरी करण्याची संधी, 'या' उमेदवारांनी करा अर्ज

सकाळी 6 वाजता ठरतात दर

सरकार ऑइल मार्केटिंग कंपनी ( HPCL, BPCL, IOC ) रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. त्याबरोबर आंतरराष्ट्रीय पेट्रोल-डिझेलच्या किमतींचाही विचार केला जातो.

पाकिस्तानात हाहाकार! भारताच्या दुप्पट किमतीत विकलं जातंय सोनं

पेट्रोल जीएसटीच्या कक्षेत आलं तर काय होईल ?

पेट्रोलची जेवढी किंमत असते तेवढाच कर त्यावर भरावा लागतो. कच्चं तेल खरेदी केल्यानंतर ते रिफायनरीमध्ये नेलं जातं आणि नंतर शुद्ध झालेलं पेट्रोल मिळतं. अशा पेट्रोल आणि डिझेलवर कर द्यावा लागतो. सगळ्यात पहिल्यांदा सरकार अबकारी कर लावतं. त्यानंतर त्या त्या राज्यांतही कर लावला जातो. त्याला सेल्स टॅक्स किंवा व्हॅट म्हटलं जातं.

या महिन्याच्या शेवटी बदलेल तुमच्या टीव्हीचा सेटटाॅप बाॅक्स, कारण...

हे सगळे कर लागल्यानंतर पेट्रोल पंपाचा डीलर त्यावर आपलं कमिशन जोडतो. काही ठिकाणी उत्पादन शुल्काशिवाय अतिरिक्त करही लावला जातो. या सगळ्या करांमुळे राज्यांची कमाई वाढते.

पेट्रोल - डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणलं तर ते सामान्य माणसाच्या हिताचं ठरेल पण यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचं नुकसान होऊ शकतं.

VIDEO: 'खायला दिलं पण खायची इच्छा नाही, मला माझा प्रपंच पाहिजे'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: petrol
First Published: Aug 9, 2019 11:16 AM IST

ताज्या बातम्या