खूशखबर! सोन्या-चांदीच्या दरात घसरण, 'हे' आहेत शुक्रवारचे भाव

Gold, Silver - सोन्या-चांदीचे दर कमी झालेत. जाणून घ्या आजचे भाव

News18 Lokmat | Updated On: Aug 9, 2019 06:03 PM IST

खूशखबर! सोन्या-चांदीच्या दरात घसरण, 'हे' आहेत शुक्रवारचे भाव

मुंबई, 09 ऑगस्ट : काल गुरुवारी सोनं कडाडलं होतं. तर आज शुक्रवारी सोन्याच्या दरात घसरण झालीय. ऑल इंडिया सराफा असोसिएशननुसार सोन्याच्या दरात 140 रुपये घसरण झालीय. दिल्लीत सोन्याचा दर 38,330 रुपये प्रति ग्रॅम झालाय. तर चांदी आज 290 रुपयांनी कमी झालीय. चांदीची किंमत 44,010 रुपये प्रति किलोग्रॅम झालीय. न्यूयाॅर्कमध्ये सोन्याची किंमत 1,504 डाॅलर प्रति औंस आहे तर चांदी वधारून 17. 12 डाॅलर प्रति औंस झालीय.

ऑल इंडिया सराफा असोसिएशननुसार दिल्लीत 99.9 टक्के सोनं 140 रुपयांनी वाढून 38,330 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 99.5 टक्के शुद्ध सोनं 38,160 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. गिन्नी सोन्याची किंमत 7 28,500 रुपये प्रति 8 ग्रॅम स्थिर राहिलीय.

SBI नंतर आता 'या' 3 बँकांनी कमी केले व्याज दर, 'इतका' द्यावा लागेल EMI

चांदीचीही घसरण झालीय. चांदी आज 290 रुपयांनी कमी झालीय. चांदीची किंमत 44,010 रुपये प्रति किलोग्रॅम झालीय. साप्ताहिक डिलिवरीच्या चांदीत 665 रुपये घसरण झालीय. तिचा भाव 43,065 रुपये प्रति किलोग्रॅम झालाय. चांदीच्या नाण्याची किंमत 1 हजार रुपयांनी वाढलीय. लिवाल 88,000 रुपये आणि बिकवाल 89,000 रुपये प्रति शेकड्यावर स्थिर राहिलीय.

घर खरेदी करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, बिल्डर नाही फसवू शकणार

Loading...

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे भाव पुढील काही महिन्यात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केवळ सोनंच नाही तर चांदीच्या दरात देखील वाढ होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ होत आहे.

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 113 महिन्यात दुप्पट होतील तुमचे पैसे

पुढील काही महिन्यात म्हणजेच दिवाळीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर 1 हजार 500 डॉलरवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेतील दरांवर होऊ शकतो. त्यामुळे देशातील सोन्याचा दर दिवाळीपर्यंत 36 हजारच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर चांदीचे दर 42 हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरावर फेडरल रिझर्व्ह बँकेचे व्याज दर, अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेला तणाव या सर्व गोष्टींचा परिणाम होऊ शकतो असं जाणकारांचं मत आहे.

VIDEO : सेल्फी व्हिडिओ काढणाऱ्या महाजनांवर धनंजय मुंडेंचा घणाघात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: gold
First Published: Aug 9, 2019 06:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...