खूशखबर, आज पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, 'हे' आहेत तुमच्या शहरातले दर

खूशखबर, आज पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, 'हे' आहेत तुमच्या शहरातले दर

Petrol, Diesel - पेट्रोल-डिझेलचे दर कमी झालेत. जाणून घ्या त्याबद्दल

  • Share this:

मुंबई, 08 ऑगस्ट : पेट्रोलचे भाव दररोज कमी होण्याचा सिलसिला सुरूच आहे. आज गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या भावात घट झालीय. पेट्रोलचे दर 4 ते 5 पैसे कमी आणि डिझेल 2 ते 6 पैसे कमी झालंय. तुम्हाला आता पेट्रोल-डिझेलसाठी कमी पैसे भरावे लागतील. दिल्लीत पेट्रोल 5 पैसे स्वस्त होऊन 72.23 रुपये प्रति लीटर झालंय. तर डिझेल 6 पैसे स्वस्त होऊन 65.88 रुपये प्रति लीटर झालंय.

मुंबईत पेट्रोल 4 पैसे कमी होऊन आता ते 77.89 रुपयांना मिळतंय. तर डिझेल 5 पैसे कमी होऊन 69.06 रुपये प्रति लीटर आहे. कोलकत्त्यात पेट्रोल 5 पैसे स्वस्त झालंय. तर डिझेल 2 पैसे. तिथे पेट्रोल 74.92 रुपये प्रति लीटर तर डिझेल 68.15 रुपये प्रति लीटर झालं. चेन्नईतही पेट्रोलची किंमत 5 पैसे कमी होऊन 75.03 रुपये प्रति लीटर झालंय. डिझेल 5 पैसे स्वस्त होऊन 69.59 रुपये प्रति लीटर झालंय.

आता परदेशात PHD करण्याची संधी, मोदी सरकार करणार खर्च

सकाळी 6 वाजता ठरतात दर

सरकार ऑइल मार्केटिंग कंपनी ( HPCL, BPCL, IOC ) रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. त्याबरोबर आंतरराष्ट्रीय पेट्रोल-डिझेलच्या किमतींचाही विचार केला जातो.

इंजिनीअरिंगचं स्वप्न बघणाऱ्या मुलींसाठी आता सरकारी स्कॉलरशिप; असा करा अर्ज

पेट्रोल जीएसटीच्या कक्षेत आलं तर काय होईल ?

पेट्रोलची जेवढी किंमत असते तेवढाच कर त्यावर भरावा लागतो. कच्चं तेल खरेदी केल्यानंतर ते रिफायनरीमध्ये नेलं जातं आणि नंतर शुद्ध झालेलं पेट्रोल मिळतं. अशा पेट्रोल आणि डिझेलवर कर द्यावा लागतो. सगळ्यात पहिल्यांदा सरकार अबकारी कर लावतं. त्यानंतर त्या त्या राज्यांतही कर लावला जातो. त्याला सेल्स टॅक्स किंवा व्हॅट म्हटलं जातं.

सोनं पुन्हा झालं महाग, चांदीही वधारली, 'हे' आहेत बुधवारचे दर

हे सगळे कर लागल्यानंतर पेट्रोल पंपाचा डीलर त्यावर आपलं कमिशन जोडतो. काही ठिकाणी उत्पादन शुल्काशिवाय अतिरिक्त करही लावला जातो. या सगळ्या करांमुळे राज्यांची कमाई वाढते.

पेट्रोल - डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणलं तर ते सामान्य माणसाच्या हिताचं ठरेल पण यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचं नुकसान होऊ शकतं.

सांगलीत गर्भवती महिलेचं LIVE रेस्क्यू ऑपरेशन, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: petrol
First Published: Aug 8, 2019 11:02 AM IST

ताज्या बातम्या