सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही झाली महाग, 'हे' आहेत गुरुवारचे दर

सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही झाली महाग, 'हे' आहेत गुरुवारचे दर

Gold, Silver -सोन्या-चांदीची खरेदी करायला जात असाल तर जाणून घ्या दर

  • Share this:

मुंबई, 08 ऑगस्ट : सोन्याचे दर दिवसेंदिवस रेकाॅर्ड करतायत. आज गुरुवारी सोन्याचा दर खूपच वधारलाय. ऑल इंडिया सराफा असोसिएशननुसार दिल्लीत सोन्याचा दर 38,000वर गेलाय. सोन्याच्या दरात 550 रुपयांची वाढ झालीय. सोनं 38,470 रुपये प्रति 10 ग्रॅम झालंय. चांदीची किंमतही वाढलीय. चांदीचा दर 44,000च्या पुढे गेलाय.

अमेरिका-चीनमधलं व्यापार युद्ध पाहता गुंतवणूकदार सारखे सोन्यात गुंतवणूक करतायत. त्यामुळे सोन्याचा दर वाढतोय. आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र सोन्याची घसरण झालीय. सोनं 1,497.40 डाॅलर प्रति औंस आहे. चांदी 17.16 डाॅलर प्रति औंस आहे.

सौर पॅनल लावून करा घरबसल्या कमाई, 'असे' मिळवता येतील पैसे

सोनं कडाडलं

दिल्लीत 99.9 टक्के सोनं 550 रुपयांनी वाढून 38,470 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 99.5 टक्के शुद्ध सोनं 38,300 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. गिन्नी सोन्याची किंमत 700 रुपयांनी वाढून 28,500 रुपये प्रति 8 ग्रॅम राहिलीय.

पाकिस्तानात हाहाकार! भारताच्या दुप्पट किमतीत विकलं जातंय सोनं

चांदीची चमक

चांदी 630 रुपयांनी वाढलीय. चांदीचा भाव 44,300 रुपये प्रति किलोग्रॅम झालाय. साप्ताहिक डिलिवरीच्या चांदीत 745 रुपये वृद्धी झालीय. तिचा भाव 43,730 रुपये प्रति किलोग्रॅम झालाय. चांदीच्या नाण्याची किंमत 1 हजार रुपयांनी वाढलीय. लिवाल 87,000 रुपये आणि बिकवाल 88,000 रुपये प्रति शेकड्यावर स्थिर राहिलीय.

TRP मीटर : सगळ्यांना जिरवत मिसेस मुख्यमंत्र्यांची एन्ट्री, 'या' मालिकेचा नंबर 1

पुढील काही महिन्यात म्हणजेच दिवाळीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर 1 हजार 500 डॉलरवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेतील दरांवर होऊ शकतो. त्यामुळे देशातील सोन्याचा दर दिवाळीपर्यंत 36 हजारच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर चांदीचे दर 42 हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरावर फेडरल रिझर्व्ह बँकेचे व्याज दर, अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेला तणाव या सर्व गोष्टींचा परिणाम होऊ शकतो असं जाणकारांचं मत आहे.

शासकीय यंत्रणा जवळपास नाहीच, शरद पवारांची UNCUT पत्रकार परिषद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: gold
First Published: Aug 8, 2019 06:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading