सोनं पुन्हा झालं महाग, चांदीही वधारली, 'हे' आहेत बुधवारचे दर

सोनं पुन्हा झालं महाग, चांदीही वधारली, 'हे' आहेत बुधवारचे दर

Gold, Silver - काल सोन्या-चांदीच्या घसरणीनंतर आज सोन्याचे भाव कडाडलेत

  • Share this:

मुंबई, 07 ऑगस्ट : ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या माहितीनुसार आज ( 7 ऑगस्ट ) सोनं सर्वात महाग झालंय. दिल्लीत सोनं 1,113 रुपयांनी महागलंय. आता ते 37,920 रुपये प्रति 10 ग्रॅम झालंय. तर चांदीही 650 रुपयांनी वधारलीय. चांदी आता 43,670 रुपये प्रति किलोग्रॅम झालीय. आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यूयाॅर्कमध्ये सोन्याची किंमत 1,487.20 डाॅलर प्रति औंस झाली, तर चांदी 16.81 डाॅलर प्रति औंस आहे.

सोन्याचा दर

दिल्लीत 99.9 टक्के सोनं 1,113 रुपयांनी वाढून 37,920 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 99.5 टक्के शुद्ध सोनं 37,750 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. गिन्नी सोन्याची किंमत 200 रुपयांनी वाढून 27,800 रुपये प्रति 8 ग्रॅम राहिलीय.

इंजिनीअरिंगचं स्वप्न बघणाऱ्या मुलींसाठी आता सरकारी स्कॉलरशिप; असा करा अर्ज

चांदीचा दर

चांदीही 650 रुपयांनी वधारलीय. चांदी आता 43,670 रुपये प्रति किलोग्रॅम झालीय. साप्ताहिक डिलिवरीच्या चांदीत 694 रुपये वृद्धी झालीय. तिचा भाव 42,985 रुपये प्रति किलोग्रॅम झालाय. चांदीच्या नाण्याची किंमत 1 हजार रुपयांनी वाढलीय. लिवाल 86,000 रुपये आणि बिकवाल 87,000 रुपये प्रति शेकड्यावर स्थिर राहिलीय.

स्वराज्यरक्षक संभाजी : कोंडाजींना जाळ्यात पकडण्यासाठी लवंगीचा 'असा' डाव

पुढील काही महिन्यात म्हणजेच दिवाळीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर 1 हजार 500 डॉलरवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेतील दरांवर होऊ शकतो. त्यामुळे देशातील सोन्याचा दर दिवाळीपर्यंत 36 हजारच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर चांदीचे दर 42 हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरावर फेडरल रिझर्व्ह बँकेचे व्याज दर, अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेला तणाव या सर्व गोष्टींचा परिणाम होऊ शकतो असं जाणकारांचं मत आहे.

RBI ची गिफ्ट! रेपो रेटमध्ये झाली कपात, आता EMI होईल 'इतका' कमी

सोन्याचा हा सर्वोच्च स्तर आहे. याचं कारण अमेरिका-चीनमधला वाढता तणाव आणि स्थानिक व्यापाऱ्यांची मागणी आहे. अमेरिकेनं गेल्या आठवड्यात चीनमधून आयात होणाऱ्या 300 अब्ज डाॅलर किमतीच्या सामानावर 10 टक्के अतिरिक्त दाम लावण्याची घोषणा केली. चीनचे राष्ट्रपती शी चिनफिंग व्यापार सामंजस्यावर अयशस्वी झाले तर हा दर वाढू शकतो. शिवाय डाॅलरच्या तुलनेत रुपया घसरलाय. त्यामुळेही सोनं कडाडलं.

ड्रोनच्या नजरेतून साताऱ्यातील पुराचे भयावह दृश्य, पाहा हा VIDEO

Published by: Sonali Deshpande
First published: August 7, 2019, 6:25 PM IST
Tags: gold

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading