लागोपाठ 6व्या दिवशी पेट्रोलच्या दरात घट, जाणून घ्या तुमच्या शहरातले भाव

लागोपाठ 6व्या दिवशी पेट्रोलच्या दरात घट, जाणून घ्या तुमच्या शहरातले भाव

Petrol, Diesel - पेट्रोलच्या दरात घसरण झालीय. तर डिझेल स्थिर राहिलंय. जाणून घ्या आजचे दर

  • Share this:

मुंबई, 06 ऑगस्ट : पेट्रोल खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. आज मंगळवारी लागोपाठ सहाव्या दिवशी पेट्रोलच्या किमतीत घट पाहायला मिळालीय. तर डिझेलचे भाव कालच्यासारखेच स्थिर राहिलेत.आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती किंचित वाढल्यात. दिल्लीत पेट्रोलच्या किमतीत 9 पैसे प्रति लीटर घट झालीय. तिथे पेट्रोलची किंमत 72.28 रुपये प्रति लीटर आहे. डिझेल 65.94 रुपये राहिलंय.

महानगरांमध्ये पेट्रोलचा दर

कोलकत्ता आणि मुंबईत पेट्रोलचा दर 9 पैसे आणि चेन्नईत 10 पैसे कमी झालाय. तसंच कोलकत्ता, मुंबई आणि चेन्नईत पेट्रोलचा दर क्रमश: 74.97 रुपये, 77.93 रुपये आणि 75.09 रुपये प्रति लीटर आहे.डिझेलच्या किमतीत काही बदल नाही. ते क्रमश: 68.17 रुपये, 69.11 रुपये आणि 69.64 रुपये प्रति लीटर आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानात डाॅक्टर, नर्स यांना नोकरीची संधी, इथे करा अर्ज

सकाळी 6 वाजता ठरतात दर

सरकार ऑइल मार्केटिंग कंपनी ( HPCL, BPCL, IOC ) रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. त्याबरोबर आंतरराष्ट्रीय पेट्रोल-डिझेलच्या किमतींचाही विचार केला जातो.

ITR भरताना चूक केलीत तर ती 'अशी' सुधारा

पेट्रोल जीएसटीच्या कक्षेत आलं तर काय होईल ?

पेट्रोलची जेवढी किंमत असते तेवढाच कर त्यावर भरावा लागतो. कच्चं तेल खरेदी केल्यानंतर ते रिफायनरीमध्ये नेलं जातं आणि नंतर शुद्ध झालेलं पेट्रोल मिळतं. अशा पेट्रोल आणि डिझेलवर कर द्यावा लागतो. सगळ्यात पहिल्यांदा सरकार अबकारी कर लावतं. त्यानंतर त्या त्या राज्यांतही कर लावला जातो. त्याला सेल्स टॅक्स किंवा व्हॅट म्हटलं जातं.

लष्कराच्या वर्दीत धोनीनं केले बूट पॉलिश, PHOTO VIRAL

हे सगळे कर लागल्यानंतर पेट्रोल पंपाचा डीलर त्यावर आपलं कमिशन जोडतो. काही ठिकाणी उत्पादन शुल्काशिवाय अतिरिक्त करही लावला जातो. या सगळ्या करांमुळे राज्यांची कमाई वाढते.

पेट्रोल - डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणलं तर ते सामान्य माणसाच्या हिताचं ठरेल पण यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचं नुकसान होऊ शकतं.

VIDEO: कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला, 107 बंधारे पाण्याखाली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: petrol
First Published: Aug 6, 2019 11:06 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading