खूशखबर, सोन्या-चांदीच्या दरात कमालीची घसरण, 'हे' आहेत मंगळवारचे भाव

Gold, Silver - काल (5 ऑगस्ट) सोन्याचा भाव कडाडला होता. पण आज ग्राहकांना दिलासा मिळालाय

News18 Lokmat | Updated On: Aug 6, 2019 06:11 PM IST

खूशखबर, सोन्या-चांदीच्या दरात कमालीची घसरण, 'हे' आहेत मंगळवारचे भाव

मुंबई, 06 ऑगस्ट : आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेली घसरण आणि घरगुती बाजारात मागणी कमी झाल्यानं सोनं आज (06 ऑगस्ट) स्वस्त झालंय. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 163 रुपयांनी कमी झाला. सोनं आता 36,807 रुपये प्रति 10 ग्रॅम झालंय. चांदीही घसरलीय. चांदीची किंमत 80 रुपये कमी होऊन 43,020 रुपये किलो झाली.

का स्वस्त झालं सोनं?

व्यापाऱ्यांचं म्हणणं असं की, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत कमी झालीय. घरगुती बाजारात सोन्याची मागणी कमी झालीय. म्हणून सोनं स्वस्त झालंय. आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयाॅर्कमध्ये सोन्याची किंमत 1,462,50 डाॅलर आणि चांदीची किंमत 16.43 डाॅलर प्रति औंस झालीय.

तुम्हालाही मिळू शकते Netflix मध्ये नोकरीची संधी, 'या' उमेदवाराला मिळेल पसंती

सोन्याचा दर

Loading...

दिल्लीत 99.9 टक्के सोनं 163 रुपयांनी कमी होऊन 36,807 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 99.5 टक्के शुद्ध सोनं 36,635 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. गिन्नी सोन्याची किंमत 27,600 रुपये प्रति 8 ग्रॅम राहिलीय.

LIC नं लाँच केली नवी पाॅलिसी, रोज 22 रुपये खर्च करून मिळतील हे 4 फायदे

चांदी झाली स्वस्त

चांदीची किंमत 80 रुपये कमी होऊन 43,020 रुपये किलो झाली.साप्ताहिक डिलिवरी चांदी 112 रुपयांनी कमी होऊन 42,291 रुपये किलो आहे. चांदीच्या नाण्याची किंमत लिवाल 85,000 रुपये आणि बिकवाल 86,000 रुपये प्रति शेकड्यावर स्थिर राहिलीय.

'डाॅ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेत भर पावसात 'असा' रंगला विवाहसोहळा

पुढील काही महिन्यात म्हणजेच दिवाळीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर 1 हजार 500 डॉलरवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेतील दरांवर होऊ शकतो. त्यामुळे देशातील सोन्याचा दर दिवाळीपर्यंत 36 हजारच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर चांदीचे दर 42 हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरावर फेडरल रिझर्व्ह बँकेचे व्याज दर, अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेला तणाव या सर्व गोष्टींचा परिणाम होऊ शकतो असं जाणकारांचं मत आहे.

भयंकर! पाण्याच्या प्रचंड लोंढ्याने क्षणांत सारा रस्ता वाहून नेला; भूस्खलनाचा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: gold
First Published: Aug 6, 2019 06:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...