पेट्रोलच्या किमतीत घसरण, 'हे' आहेत आजचे भाव

पेट्रोलच्या किमतीत घसरण, 'हे' आहेत आजचे भाव

Petrol, Diesel - पेट्रोलचे दर कमी झालेत. तर डिझेलचे भाव स्थिर राहिलेत. जाणून घ्या आजच्या किमती

  • Share this:

मुंबई, 05 ऑगस्ट : आज आठवड्याची सुरुवात ग्राहकांना दिलासा देणारी ठरलीय. दिल्लीसह अनक महानगरांमध्ये पेट्रोलचे दर कमी झालेत. ते 15 ते 16 पैसे कमी झालेत. पेट्रोलसाठी तुम्हाला कमी पैसे द्यावे लागतील. डिझेलचा दर स्थिर आहे. जाणून घेऊ आजचे ( 5 ऑगस्ट ) दर

दिल्लीत पेट्रोलचा भाव 15 पैसे कमी झालाय. तो आता 72.37 रुपये प्रति लीटर झालाय. तर डिझेल जुन्या दरात 65.94 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत पेट्रोल 15 पैसे स्वस्त झालंय. मुंबईत आता पेट्रोल 78.02 रुपये प्रति लीटर मिळतंय. तर डिझेल जुन्या भावात 69.11 रुपये प्रति लीटर आहे.

कोलकत्त्यात पेट्रोल 15 पैसे स्वस्त झालंय. त्याची किंमत 75.06 रुपये प्रति लीटर झालीय. डिझेल 68.17 रुपये प्रति लीटर आहे.  चेन्नईत पेट्रोलची किंमत 16 पैसे स्वस्त झालीय. ते 75.18 रुपये प्रति लीटर झालंय. तर डिझेल जुन्या भावात 69.64 रुपये प्रति लीटर मिळतंय.

पेट्रोलचे दर जाणून घेण्यासाठी SMS करता येतो. इंडियन ऑयल ग्राहक RSP-डीलर कोड-92249 9 2249 वर मेसेज करू शकतो. बीपीसीएल  RSP-डीलर कोड- 9223112222 वर मेसेज करू शकतो. एचपीसीएल ग्राहक HPPRICE-डीलर कोड- 9222201122 इथे मेसेज करू शकतो.

या ऑइल कंपन्यांचे अॅपही आहेत. त्यामार्फतही पेट्रोल - डिझेलचे भाव कळू शकतात. इंडियन ऑयलचं Fuel@IOC, बीपीसीएल ग्राहक SmartDrive अॅप, तर एचपीसीएलचं My HPCL अशी अॅप्स आहेत.

याशिवाय ऑइल कंपन्यांच्या वेबसाइट्स आहेत. इंडियन ऑयलचीवेबसाइट www.iocl.com, बीपीसीएलची वेबसाइट www.bharatpetroleum.com, एचपीसीएलची  www.hindustanpetroleum.com इथेही तुम्हाला रोजचे दर कळू शकतात.

सकाळी 6 वाजता ठरतात दर

सरकार ऑइल मार्केटिंग कंपनी ( HPCL, BPCL, IOC ) रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. त्याबरोबर आंतरराष्ट्रीय पेट्रोल-डिझेलच्या किमतींचाही विचार केला जातो.

पेट्रोल जीएसटीच्या कक्षेत आलं तर काय होईल ?

पेट्रोलची जेवढी किंमत असते तेवढाच कर त्यावर भरावा लागतो. कच्चं तेल खरेदी केल्यानंतर ते रिफायनरीमध्ये नेलं जातं आणि नंतर शुद्ध झालेलं पेट्रोल मिळतं. अशा पेट्रोल आणि डिझेलवर कर द्यावा लागतो. सगळ्यात पहिल्यांदा सरकार अबकारी कर लावतं. त्यानंतर त्या त्या राज्यांतही कर लावला जातो. त्याला सेल्स टॅक्स किंवा व्हॅट म्हटलं जातं.

हे सगळे कर लागल्यानंतर पेट्रोल पंपाचा डीलर त्यावर आपलं कमिशन जोडतो. काही ठिकाणी उत्पादन शुल्काशिवाय अतिरिक्त करही लावला जातो. या सगळ्या करांमुळे राज्यांची कमाई वाढते.

पेट्रोल - डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणलं तर ते सामान्य माणसाच्या हिताचं ठरेल पण यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचं नुकसान होऊ शकतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: petrol
First Published: Aug 5, 2019 11:06 AM IST

ताज्या बातम्या