आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचा भाव कडाडला, 'हे' आहेत आजचे दर

आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचा भाव कडाडला, 'हे' आहेत आजचे दर

Gold, Silver - सोन्या-चांदीच्या दरात खूप वाढ झालीय. जाणून घ्या आजचे भाव

  • Share this:

मुंबई, 05 ऑगस्ट : अमेरिका आणि चीनमधल्या वाढत्या व्यापार तणावामुळे सोनं आज खूपच महाग झालंय. गुंतवणूकदारांचा सोन्यामधला रस वाढल्यानं सोमवारी ( 5 ऑगस्ट ) सोनं 800 रुपयांनी वाढलं आणि सोनं 36,970 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोचलं. चांदीतही मजबूत वाढ झालीय. चांदी 1000 रुपयांनी वाढून 43,100 रुपये किलोवर पोचलीय. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1,459.46 डाॅलर झालंय.

सोन्याची किंमत वाढण्यामागे कारण

मे 2013नंतर सोन्याचा हा सर्वोच्च स्तर आहे. याचं कारण अमेरिका-चीनमधला वाढता तणाव आणि स्थानिक व्यापाऱ्यांची मागणी आहे. अमेरिकेनं गेल्या आठवड्यात चीनमधून आयात होणाऱ्या 300 अब्ज डाॅलर किमतीच्या सामानावर 10 टक्के अतिरिक्त दाम लावण्याची घोषणा केली. चीनचे राष्ट्रपती शी चिनफिंग व्यापार सामंजस्यावर अयशस्वी झाले तर हा दर वाढू शकतो. शिवाय डाॅलरच्या तुलनेत रुपया घसरलाय. त्यामुळेही सोनं कडाडलं.

अमित शहांच्या भाषणानंतर पाकिस्तानी शेअर बाजार कोलमडला; कोट्यवधी बुडाले

सोन्याचा नवा दर

दिल्लीत 99.9 टक्के सोनं 36,970 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 99.5 टक्के शुद्ध सोनं 36,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. गिन्नी सोन्याची किंमत 100 रुपयांनी वाढून 27,600 रुपये प्रति 8 ग्रॅम राहिलीय.

मोदी सरकार देतेय 1500 रुपयांपर्यंत स्वस्त सोनं खरेदीची संधी, होणार हे 3 फायदे

चांदीही चमकली

चांदी 1000 रुपयांनी वाढून 43,100 रुपये किलोवर पोचलीय. साप्ताहिक डिलिव्हरीची किंमत 1,039 रुपये वाढलीय. ती आता 42,403 रुपये किलो झालीय. चांदीच्या नाण्याची किंमत लिवाल 85,000 रुपये आणि बिकवाल 86,000 रुपये प्रति शेकड्यावर स्थिर राहिलीय.

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ऑफिसर पदासाठी भरती, 'या' उमेदवारांनी करा अर्ज

पुढील काही महिन्यात म्हणजेच दिवाळीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर 1 हजार 500 डॉलरवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेतील दरांवर होऊ शकतो. त्यामुळे देशातील सोन्याचा दर दिवाळीपर्यंत 36 हजारच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर चांदीचे दर 42 हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरावर फेडरल रिझर्व्ह बँकेचे व्याज दर, अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेला तणाव या सर्व गोष्टींचा परिणाम होऊ शकतो असं जाणकारांचं मत आहे.

कलम 370 विधेयकावर आठवलेंची राज्यसभेत कविता, पाहा हा VIDEO

First published: August 5, 2019, 6:00 PM IST
Tags: gold

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading