खूशखबर! लागोपाठ तिसऱ्या दिवशी पेट्रोल झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

Petrol, Diesel - पेट्रोल स्वस्त झालं तर डिझेलची किंमत स्थिर राहिलीय. जाणून घ्या आजचे दर

News18 Lokmat | Updated On: Aug 3, 2019 11:57 AM IST

खूशखबर! लागोपाठ तिसऱ्या दिवशी पेट्रोल झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

मुंबई, 03 ऑगस्ट : पेट्रोल-डिझेलच्या किमतीत शनिवारी ( 3 ऑगस्ट ) दिलासा मिळालाय. तिसऱ्या दिवशी पेट्रोलच्या किमतीत गिरावट आलीय. शुक्रवारी 11 पैसे कमी झालेल्या पेट्रोलमध्ये आज 7 पैसे प्रति लीटर घट झालीय. डिझेलच्या किमतीत चौथ्या दिवशी काही बदल झालेला नाही. दिल्लीत 1 लीटर पेट्रोलचा भाव 72.62 रुपये प्रति लीटर आहे. तर डिझेलची किंमत 66 रुपये कायम राहिलीय.

महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचा दर

शनिवारी मुंबई, कोलकत्ता इथे पेट्रोलचा दर 7 पैशांनी आणि चेन्नईत 8 पैशांनी प्रति लीटर कमी झालाय. कोलकत्ता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत क्रमश: 75.30 रुपये, 78.27 रुपये आणि 75.45 रुपये प्रति लीटर झालाय. डिझेलच्या दरात काही बदल झाले नाहीत. डिझेल जुन्या दरांनी या महानगरांत क्रमश: 68.19 रुपये, 69.17 रुपये आणि  69.72 रुपये मिळतंय.

असे पाहा पेट्रोलचे दर

पेट्रोलचे दर जाणून घेण्यासाठी SMS करता येतो. इंडियन ऑयल ग्राहक RSP-डीलर कोड-92249 9 2249 वर मेसेज करू शकतो. बीपीसीएल  RSP-डीलर कोड- 9223112222 वर मेसेज करू शकतो. एचपीसीएल ग्राहक HPPRICE-डीलर कोड- 9222201122 इथे मेसेज करू शकतो.

Loading...

'या' बँकेच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये मिळतो FD पेक्षा जास्त फायदा

या ऑइल कंपन्यांचे अॅपही आहेत. त्यामार्फतही पेट्रोल - डिझेलचे भाव कळू शकतात. इंडियन ऑयलचं Fuel@IOC, बीपीसीएल ग्राहक SmartDrive अॅप, तर एचपीसीएलचं My HPCL अशी अॅप्स आहेत.

याशिवाय ऑइल कंपन्यांच्या वेबसाइट्स आहेत. इंडियन ऑयलचीवेबसाइट www.iocl.com, बीपीसीएलची वेबसाइट www.bharatpetroleum.com, एचपीसीएलची  www.hindustanpetroleum.com इथेही तुम्हाला रोजचे दर कळू शकतात.

सोन्याच्या दरात घसरण तर चांदी महागली, 'हे' आहेत शुक्रवारचे दर

सकाळी 6 वाजता ठरतात दर

सरकार ऑइल मार्केटिंग कंपनी ( HPCL, BPCL, IOC ) रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. त्याबरोबर आंतरराष्ट्रीय पेट्रोल-डिझेलच्या किमतींचाही विचार केला जातो.

'अशा' प्रकारे भरू शकता फक्त 7 मिनिटांत ITR, इन्कम टॅक्सची नवी सुविधा

पेट्रोल जीएसटीच्या कक्षेत आलं तर काय होईल ?

पेट्रोलची जेवढी किंमत असते तेवढाच कर त्यावर भरावा लागतो. कच्चं तेल खरेदी केल्यानंतर ते रिफायनरीमध्ये नेलं जातं आणि नंतर शुद्ध झालेलं पेट्रोल मिळतं. अशा पेट्रोल आणि डिझेलवर कर द्यावा लागतो. सगळ्यात पहिल्यांदा सरकार अबकारी कर लावतं. त्यानंतर त्या त्या राज्यांतही कर लावला जातो. त्याला सेल्स टॅक्स किंवा व्हॅट म्हटलं जातं.

हे सगळे कर लागल्यानंतर पेट्रोल पंपाचा डीलर त्यावर आपलं कमिशन जोडतो. काही ठिकाणी उत्पादन शुल्काशिवाय अतिरिक्त करही लावला जातो. या सगळ्या करांमुळे राज्यांची कमाई वाढते.

पेट्रोल - डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणलं तर ते सामान्य माणसाच्या हिताचं ठरेल पण यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचं नुकसान होऊ शकतं.

काळीज पिळवटून टाकणारा VIDEO, नदी ओलांडताना क्षणात वाहून गेल्या गायी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: petrol
First Published: Aug 3, 2019 11:57 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...