सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली, 'हे' आहेत मंगळवारचे दर

सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली, 'हे' आहेत मंगळवारचे दर

Gold, Silver - सोन्याची खरेदी करण्याआधी जाणून घ्या आजचे दर

  • Share this:

मुंबई, 13 ऑगस्ट : काल सोनं चांगलंच महागलं होतं. पण आज सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळालीय. सोन्याचा भाव 100 रुपयांनी कमी होऊन 38,370 रुपये प्रति ग्रॅम झालाय. आज मंगळवारी चांदी मात्र चांगलीच कडाडलीय.ऑल इंडिया सराफा असोसिएशननुसार चांदी आज 2 हजार रुपयांनी महाग झालीय. तिचा दर 45,000 रुपये प्रति किलोग्रॅम झालाय. आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयाॅर्कमध्ये सोन्याची किंमत  1,520.37 डाॅलर प्रति औंस झालीय, तर चांदी 17.32 डाॅलर प्रति औंस आहे.

सोन्याचा आजचा दर

ऑल इंडिया सराफा असोसिएशननुसार दिल्लीत 99.9 टक्के सोनं 100 रुपयांनी वाढून 38,370 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 99.5 टक्के शुद्ध सोनं 38,200रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. गिन्नी सोन्याची किंमत 200 रुपयांनी वाढून  28,800 रुपये प्रति 8 ग्रॅम आहे.

सातव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळणार पगार, 80 हजारांनी सुरुवात, 'इथे' आहे संधी

चांदीची चमक

आज चांदीमध्ये 2000 रुपयांची तेजी पाहायला मिळाली. तिचा दर 45,000 रुपये प्रति किलोग्रॅम झालाय. साप्ताहिक डिलिवरीवाली चांदी 956 रुपयांनी वाढून 44,280 रुपये प्रति किलोग्रॅम होती. चांदीच्या नाण्यांची लिवाली किंमत 1000 रुपयांनी वाढून 89,000 रुपये प्रति शेकडा झालीय, तर बिकवाली किंमत 1000 रुपयांनी वाधून 90,000 रुपये प्रति शेकडा झालीय.

CA Result : आज घोषित होणार CA चा निकाल? icai.org या साईटवर जाहीर होणार

का होतंय सोनं महाग?

अमेरिका-चीनमधलं व्यापार युद्ध पाहता गुंतवणूकदार सारखे सोन्यात गुंतवणूक करतायत. त्यामुळे सोन्याचा दर वाढतोय.

2013 नंतर सोनं उच्च स्तरावर

जियोजित फायनॅन्शियल सर्विसेसचे कमोडिटी रिसर्च विभागाचे प्रमुख हरीश म्हणतात की, आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1500 डाॅलर्स प्रति औंस आहे. 2013नंतरचा हा अत्युच्चम स्तर आहे.

आधार कार्डाच्या मदतीनं 'अशी' बुक करा ट्रेनची तिकिटं, 'असा' होतो फायदा

त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेतील दरांवर होऊ शकतो. त्यामुळे देशातील सोन्याचा दर दिवाळीपर्यंत 36 हजारच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर चांदीचे दर 42 हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरावर फेडरल रिझर्व्ह बँकेचे व्याज दर, अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेला तणाव या सर्व गोष्टींचा परिणाम होऊ शकतो असं जाणकारांचं मत आहे.

VIDEO : जगण्यासाठी काही राहिलं नाही, कोसळलेलं घरं पाहून आजींना अश्रू अनावर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: gold
First Published: Aug 13, 2019 06:07 PM IST

ताज्या बातम्या