ईदच्या दिवशी सोनं महागलं आणि चांदी झाली स्वस्त, 'हे' आहेत आजचे दर

ईदच्या दिवशी सोनं महागलं आणि चांदी झाली स्वस्त, 'हे' आहेत आजचे दर

Gold, Silver - जाणून घ्या सोन्या-चांदीचे आजचे दर

  • Share this:

मुंबई, 12 ऑगस्ट : सोन्याच्या किमती वाढण्याचा सिलसिला ईदच्या दिवशीही सुरूच राहिलाय. आज ( 12ऑगस्ट ) 10 ग्रॅम सोन्याची किंमत 50 रुपयांनी वाढून ती 38,470 रुपये झालीय. दिल्लीत तर आज सोनं सर्वात महाग होतं. चांदीची मागणी कमी झाल्यानं 1 किलोग्रॅम चांदीची किंमत 1150 रुपये कमी होऊन 43,000 रुपये प्रति किलोग्रॅम झालीय. आंतरराष्ट्रीय स्तरावरही सोन्याच्या किमती कडाडल्यात.

सोन्याचा दर

ऑल इंडिया सराफा असोसिएशननुसार दिल्लीत 99.9 टक्के सोनं 50 रुपयांनी वाढून 38,470 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 99.5 टक्के शुद्ध सोनं 38,470 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. गिन्नी सोन्याची किंमत  28,500 रुपये प्रति 8 ग्रॅम स्थिर राहिलीय.

दिवाळीत विमानानं प्रवास करताय? आताच बुक करा तिकीट, नाही तर खिशाला 'इतकी' कात्री

चांदी झाली स्वस्त

चांदीची मागणी कमी झाल्यानं 1 किलोग्रॅम चांदीची किंमत 1150 रुपये कमी होऊन 43,000 रुपये प्रति किलोग्रॅम झालीय.चांदीच्या नाण्यांना मात्र चांगली मागणी आहे. चांदीचा भाव लिवाल 88,000 रुपये आणि बिकवाल 89,000 रुपये प्रति शेकडा आहे.

का होतंय सोनं महाग?

अमेरिका-चीनमधलं व्यापार युद्ध पाहता गुंतवणूकदार सारखे सोन्यात गुंतवणूक करतायत. त्यामुळे सोन्याचा दर वाढतोय.

ATM मधून पैसे काढताना 'अशी' घ्या काळजी, नाही तर रिकामं होईल तुमचं अकाउंट

2013 नंतर सोनं उच्च स्तरावर

जियोजित फायनॅन्शियल सर्विसेसचे कमोडिटी रिसर्च विभागाचे प्रमुख हरीश म्हणतात की, आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1500 डाॅलर्स प्रति औंस आहे. 2013नंतरचा हा अत्युच्चम स्तर आहे.

मोदी सरकारची नवी योजना, स्वयंपाकाच्या तेलापासून 'अशी' चालेल तुमची कार

त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेतील दरांवर होऊ शकतो. त्यामुळे देशातील सोन्याचा दर दिवाळीपर्यंत 36 हजारच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर चांदीचे दर 42 हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरावर फेडरल रिझर्व्ह बँकेचे व्याज दर, अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेला तणाव या सर्व गोष्टींचा परिणाम होऊ शकतो असं जाणकारांचं मत आहे.

VIDEO : राज ठाकरे यांच्यापाठोपाठ नारायण राणे यांनीही केली 'ही' मागणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: gold
First Published: Aug 12, 2019 06:57 PM IST

ताज्या बातम्या