पेट्रोलच्या दरात बदल नाही, डिझेल आणखी स्वस्त, 'हे' आहेत आजचे दर

Petrol, Diesel - पेट्रोल-डिझेलच्या आजच्या किमती घ्या जाणून

News18 Lokmat | Updated On: Aug 10, 2019 10:55 AM IST

पेट्रोलच्या दरात बदल नाही, डिझेल आणखी स्वस्त, 'हे' आहेत आजचे दर

मुंबई, 10 ऑगस्ट : पेट्रोलचे दर लागोपाठ कमी झाल्यानंतर आज शनिवारी पेट्रोलच्या दरात काही बदल झालेला नाही. डिझेलही स्वस्त झालंय. ते 11 पैसे प्रति लीटर झालंय. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानं पेट्रोल आणि डिझेल लागोपाठ स्वस्त होतंय.

दिल्लीत पेट्रोल 72.08 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 65.64 रुपये प्रति लीटर आहे. कोलकत्ता, मुंबई आणि चेन्नई इथे पेट्रोलचे दर 74.74 रुपये, 77.74 रुपये आणि 74.88 रुपये प्रति लीटर झालेत. तीन महानगरांमध्ये कोलकत्ता, मुंबई आणि चेन्नई इथे डिझेल क्रमश: 68.01 रुपये, 68.82 रुपये आणि 69.35रुपये प्रति लीटर आहे.

B.Com आणि MBA साठी नोकरीची संधी, 'असा' करा अर्ज

सकाळी 6 वाजता ठरतात दर

सरकार ऑइल मार्केटिंग कंपनी ( HPCL, BPCL, IOC ) रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. त्याबरोबर आंतरराष्ट्रीय पेट्रोल-डिझेलच्या किमतींचाही विचार केला जातो.

Loading...

ऑनलाइन बाइक इन्शुरन्स रिन्यू करायचंय? मग 'ही' काळजी घ्यायलाच हवी

पेट्रोल जीएसटीच्या कक्षेत आलं तर काय होईल ?

पेट्रोलची जेवढी किंमत असते तेवढाच कर त्यावर भरावा लागतो. कच्चं तेल खरेदी केल्यानंतर ते रिफायनरीमध्ये नेलं जातं आणि नंतर शुद्ध झालेलं पेट्रोल मिळतं. अशा पेट्रोल आणि डिझेलवर कर द्यावा लागतो. सगळ्यात पहिल्यांदा सरकार अबकारी कर लावतं. त्यानंतर त्या त्या राज्यांतही कर लावला जातो. त्याला सेल्स टॅक्स किंवा व्हॅट म्हटलं जातं.

SBI ची नवी योजना, तुमचं घरच देईल तुम्हाला 'असं' पेन्शन

हे सगळे कर लागल्यानंतर पेट्रोल पंपाचा डीलर त्यावर आपलं कमिशन जोडतो. काही ठिकाणी उत्पादन शुल्काशिवाय अतिरिक्त करही लावला जातो. या सगळ्या करांमुळे राज्यांची कमाई वाढते.

पेट्रोल - डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणलं तर ते सामान्य माणसाच्या हिताचं ठरेल पण यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचं नुकसान होऊ शकतं.

SPECIAL REPORT: महापुरामुळे 40 गावं दिसेनाशी झाली, कधी मिळणार सरकारची मदत?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: petrol
First Published: Aug 10, 2019 10:55 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...