सरकारबरोबर व्यवसाय करण्याच्या विचारात आहात? याठिकाणी करा नोंदणी, वाचा या सरकारी योजनेबद्दल

सरकारबरोबर व्यवसाय करण्याच्या विचारात आहात? याठिकाणी करा नोंदणी, वाचा या सरकारी योजनेबद्दल

केंद्र सरकारच्या काही योजना अशा आहेत, ज्यामध्ये जोडले जाऊन तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. वाचा काय आहेत या योजना.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 जानेवारी: जर तुम्ही सरकारच्या साथीने नवा व्यवसाय सुरू करू इच्छित असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. केंद्र सरकारने सर्व सरकारी विभागांना गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेसशी (GeM) जोडले आहे. आता सरकारी विभाग त्यांच्या उपयोगासाठी आवश्यक वस्तू आणि सेवा ई पोर्टल GeM च्या माध्यमातून खरेदी करतील. अर्थात ही सर्व खरेदी ऑनलाईन होईल. तुम्ही देखील या पोर्टलशी जोडले जाऊन सरकारबरोबर व्यवसाय करू शकता. वाचा सविस्तर...

काय आहे GeM पोर्टल?

मोदी सरकारने ई-पोर्टलच्या माध्यमातून GeM अर्थात ऑनलाइन बाजार तयार केला आहे. तुम्ही घरबसल्या यामध्ये नोंदणी करून व्यवसाय करू शकता. तुमचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर विविध सरकारी विभागातील मागणीच्या हिशोबाने पुरवठा करू शकता. याकरता तुम्हाला मॅन्युफॅक्चररशी संपर्क करावा लागेल, जेणेकरून मागणी आल्यानंतर तुम्ही तुमच्या व्यवसायातील माल पुढे पाठवू शकता. सरकारी विभाग त्यांच्यासाठी 50 हजार रुपयांपर्यंतचे सामान ई-पोर्टल GeM च्या अंतर्गत खरेदी करू शकतात.

(हे वाचा: Amazon-Flipkart वर कारवाई करणार ED आणि RBI, मोदी सरकारचे निर्देश)

GeM वर कुणाला करता येईल विक्री?

कोणताही विक्रेता या जो एखादं उत्पादन करतो किंवा उपयुक्त आणि प्रमाणित उत्पादनाची विक्री करतो तो GeM वर नोंदणी करू शकतो. उदाहरणार्थ जर तुम्ही संगणकांची विक्री करत असाल तर तुम्ही GeM वर नोंदणी करू शकता. यानंतर भारत सरकार मधील कोणताही विभाग संगणक खरेदी करण्यासाठी टेंडर काढणार असतील तर याची माहिती तुम्हाला मिळेल आणि या टेंडरसाठी तुम्ही बोली लावू शकता किंवा निविदा देऊ शकता.

(हे वाचा: FD काढायचा विचार करताय? तपासा या टॉप 5 बँका किती व्याजदर देत आहेत)

कसं कराल रजिस्ट्रेशन?

ही प्रक्रिया फार सोपी आहे. तुम्हाला GeM वर फॉर्म आणि इतर माहिती भरायची आहे. याठिकाणी तुम्हाला आयडी-पासवर्ड जनरेट करावा लागेल. एकदा तुम्ही नोंदणी केली की, सरकारच्या कोणत्याही खरेदीबाबतच्या टेंडरची माहिती तुम्हाला SMS च्या माध्यमातून पाठवली जाईल. तुम्ही याठिकाणी नोंदणी केल्यानंतर सरकारी कंपन्यांमध्ये तुमची सेवा देखील पुरवू शकता

Published by: Janhavi Bhatkar
First published: January 1, 2021, 10:05 AM IST

ताज्या बातम्या