मराठी बातम्या /बातम्या /मनी /LIC IPO : एलआयसी आयपीओ खरेदीसाठी पॉलिसीधारकांनी पॅन पॉलिसीशी लिंक करणं आवश्यक

LIC IPO : एलआयसी आयपीओ खरेदीसाठी पॉलिसीधारकांनी पॅन पॉलिसीशी लिंक करणं आवश्यक

LIC बहुचर्चित, बहुप्रतीक्षित आयपीओ (IPO) लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे. हा आयपीओ कधी दाखल होणार किंवा त्याचा प्राइस बँड (Price band) काय असेल, याविषयी अद्याप काहीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही; मात्र एलआयसी या पब्लिक इश्यूसाठी (Public Issue) जोरदार तयारी करत आहे.

LIC बहुचर्चित, बहुप्रतीक्षित आयपीओ (IPO) लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे. हा आयपीओ कधी दाखल होणार किंवा त्याचा प्राइस बँड (Price band) काय असेल, याविषयी अद्याप काहीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही; मात्र एलआयसी या पब्लिक इश्यूसाठी (Public Issue) जोरदार तयारी करत आहे.

LIC बहुचर्चित, बहुप्रतीक्षित आयपीओ (IPO) लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे. हा आयपीओ कधी दाखल होणार किंवा त्याचा प्राइस बँड (Price band) काय असेल, याविषयी अद्याप काहीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही; मात्र एलआयसी या पब्लिक इश्यूसाठी (Public Issue) जोरदार तयारी करत आहे.

पुढे वाचा ...

    मुंबई, 3 डिसेंबर : देशातली सर्वांत मोठी सार्वजनिक आयुर्विमा कंपनी असलेलं भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीचा (LIC) बहुचर्चित, बहुप्रतीक्षित आयपीओ (IPO) लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे. हा आयपीओ कधी दाखल होणार किंवा त्याचा प्राइस बँड (Price band) काय असेल, याविषयी अद्याप काहीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही; मात्र एलआयसी या पब्लिक इश्यूसाठी (Public Issue) जोरदार तयारी करत आहे. कंपनीने या आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या पॉलिसीधारकांना (Policyholder) ऑफरमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं असून, त्यासाठी डीमॅट खाती (Demat Account) उघडण्याचं आवाहन केलं आहे. भांडवल बाजार नियामक असलेल्या 'सेबी'कडे (SEBI) आयपीओ प्रॉस्पेक्टसचा मसुदा या आठवड्यात दाखल करण्याचं कंपनीचं नियोजन आहे. बाजारातून 40 हजार कोटी ते 1 लाख कोटी रुपयांचा निधी मिळण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षात खासगीकरण आणि भागभांडवल विक्रीतून 1.75 कोटी रुपयांचं निर्गुंतवणुकीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सरकारसाठी एलआयसीचा आयपीओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

    दरम्यान, याबाबत एलआयसीने गुरुवारी (2 डिसेंबर) प्रसिद्ध केलेल्या एका जाहिरातीत या आयपीओमध्ये सहभागी होण्यासाठी पॉलिसीधारकांना त्यांचे पॅन तपशील आयुर्विमा महामंडळाच्या रेकॉर्डमध्ये अपडेट केलेले असतील याची खात्री करणं आवश्यक असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच पॉलिसीधारकांकडे वॅलिड डीमॅट खातं असणंही आवश्यक आहे. ज्या पॉलिसीधारकांनी अद्याप आपलं पॅन कार्ड एलआयसीशी लिंक (Pan-Lic Link) केलं नसेल, त्यांनी लवकरात लवकर ते करून घ्यावं. केवायसीसाठी (KYC) ही पूर्तता करणं महत्त्वाचं असून, यामुळे या आयपीओमध्ये सहभागी होता येईल, असं या जाहिरातीत नमूद करण्यात आलं आहे.

    पेनी स्टॉकचा धमाका! 2 रुपयांचा स्टॉक 74 रुपयांवर, सहा महिन्यात 1 लाख बनले 34 लाख

    तुम्ही पॉलिसीधारक असाल आणि एलआयसी आयपीओमध्ये (LIC IPO) गुंतवणूक करण्याची इच्छा असेल, तर डिमॅट खातं उघडण्याबरोबरच तुमच्या पॅनकार्डची माहिती एलआयसी रेकॉर्डवर अपडेट करणं अत्यावश्यक आहे. तुमचं पॅन कार्ड एलआयसीशी लिंक झालेलं आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी एक सोपी प्रक्रिया आहे.

    - सर्वांत आधी https://linkpan.licindia.in/UIDSeedingWebApp/getPolicyPANStatus या लिंकवर जावं.

    - योग्य त्या बॉक्समध्ये पॉलिसी क्रमांक, पॅन तपशील आणि जन्मतारीख भरा.

    -  कॅप्चा कोड भरा. यानंतर तुम्ही तुमचं एलआयसी पॉलिसी-पॅन लिंक स्टेटस पाहू शकाल.

    तुम्ही एलआयसीशी पॅन लिंक केलं नसेल, तर अगदी सोप्या पद्धतीनं ते अपडेट करता येते. यासाठीची प्रक्रियाही सोपी आहे.

    - पॅन-एलआयसी लिंक करण्यासाठी सर्वात आधी https://licindia.in/ या लिंकद्वारे अधिकृत LIC वेबसाइटवर जावं किंवा https://linkpan.licindia.in/UIDSeedingWebApp/ या लिंकवर जावं.

    - मुख्य पृष्ठावरून ऑनलाइन पॅन नोंदणी पर्याय निवडून नंतर प्रोसीड या पर्यायावर क्लिक करावं.

    - पॅन, एलआयसी पॉलिसी क्रमांक, मोबाइल नंबर आणि ई-मेल ही माहिती भरावी. सर्व माहिती व्यवस्थित भरणं आवश्यक आहे.

    - नियुक्त बॉक्समध्ये कॅप्चा भरा.

    - तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर OTP मागवा.

    - पोर्टलमध्ये OTP भरा आणि सबमिट करा.

    - तुमचं पॅन कार्ड एलआयसीशी लिंक होईल.

    शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सहज उपलब्ध होणार कर्ज, SBI ची Adani Capital शी हातमिळवणी

    पॅन ऑनलाइन लिंक करण्यात अडचण येत असेल तर तुम्ही एलआयसी एजंटशीदेखील संपर्क साधू शकता. तुमच्याकडे पॅन कार्ड नसेलच, तर ते मिळाल्यानंतर ते एलआयसीशी लिंक करण्याची शिफारस केली जाते.

    केंद्रीय अर्थमंत्री (Finance Minister) निर्मला सीतारामन यांनी एलआयसीच्या आयपीओची कल्पना 2020-2021 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात प्रथम मांडली. आयुर्विमा महामंडळातला आपला हिस्सा 10 टक्क्यांनी कमी करण्याचा सरकारचा मानस आहे. त्यासाठी हा आयपीओ आणण्यात येत असून, लवकरात लवकर हा आयपीओ आणण्याची सरकारची इच्छा आहे. त्यामुळे चालू आठवड्यात एलआयसी सेबीकडे आपला मसुदा दाखल करण्याची शक्यता आहे.

    First published:

    Tags: Investment, LIC, Money