Home /News /money /

Titan चे शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकावर, Q3 मध्ये जोरदार कमाई; गुंतवणूकदारांनी आता काय करावं?

Titan चे शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकावर, Q3 मध्ये जोरदार कमाई; गुंतवणूकदारांनी आता काय करावं?

वार्षिक आधारावर Q3FY22 मध्ये (ऑक्टोबर-डिसेंबर) Titan कंपनीच्या ज्वेलरी व्यवसायात कमाईत 37 टक्के वाढ झाली आहे, तर घड्याळे आणि वेअरेबल्समध्ये 28 टक्के वाढ झाली आहे.

    मुंबई, 7 जानेवारी : डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीने मजबूत कमाई वाढ केल्यानंतर 7 जानेवारीच्या सुरुवातीच्या व्यापारात टायटन कंपनीच्या (Titan Company) शेअरची किंमत 3 टक्क्यांहून अधिक वाढून 52 आठवड्यांच्या उच्चांकी 2,687.30 रुपयांवर पोहोचली आहे. कंपनीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की टायटन कंपनीच्या गेल्या वर्षीच्या सणासुदीच्या तिमाहीत कन्जुमर बिझनेसमधून जोरदार वाढ दिसली आणि तिच्या कमाईत 36 टक्के वाढ नोंदवली. वार्षिक आधारावर Q3FY22 मध्ये (ऑक्टोबर-डिसेंबर) कंपनीच्या ज्वेलरी व्यवसायात कमाईत 37 टक्के वाढ झाली आहे, तर घड्याळे आणि वेअरेबल्समध्ये 28 टक्के वाढ झाली आहे. त्याच्या आय वेअर सेगमेंटच्या कमाईत 27 टक्के वाढ झाली आहे तर इतर व्यवसाय 44 टक्क्यांनी वाढले आहेत. कंपनीने ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत या विभागामध्ये 89 नवीन स्टोअर्स जोडले आणि एकूण स्टोअर्सची संख्या 1,935 झाली. Budget 2022 : अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजाराची चाल कशी असते? समजून घ्या आणि नियोजन करा Motilal Oswal यांचे मत स्टॉकवर भाष्य करताना, मोतीलाल ओसवाल म्हणाले की, टायटन कंपनीने दागिन्यांच्या विभागातील मजबूत विक्री वाढीमुळे चांगली कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे, बेस क्वार्टरमध्ये या सेगमेंटमध्ये वार्षिक आधारावर 22 टक्के वाढ झाली आहे. याने दोन वर्षांच्या आधारे 26 टक्के विक्री CAGR दिला आहे, जो उत्तम आहे. ज्वेलरी व्यवसायातील उच्च वार्षिक योगदानामुळे 3QFY22 मध्ये ऑपरेटिंग मार्जिन सुधारण्याची शक्यता आहे. मजबूत टॉपलाइन वाढीमुळे देखील EBITDA वाढेल. टायटनसाठी स्ट्रक्चरल गुंतवणूक अत्यंत मजबूत आहे. त्यामुळे, शेअरमध्ये 2950 च्या टार्गेटसह BUY रेटिंग कायम ठेवलं आहे. Omicron मुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका! GDP ग्रोथमध्ये घट होण्याचा अंदाज Prabhudas Lilladher यांचे मत यावर भाष्य करताना Prabhudas Lilladher म्हणाले की आम्ही आर्थिक वर्ष 22/23/24 साठी EPS अंदाज 10 टक्के, 5.8 टक्के आणि 6.5 टक्क्यांनी वाढत 25.6/33.4/42.2 करत आहेत आणि DCF आधारित टार्गेट किंमत 2915 रुपये (2651 पूर्वी) पर्यंत वाढवत आहोत. घड्याळ आणि आयवेअरची विक्री आमच्या अपेक्षेपेक्षा थोडी कमी असली तरी तिसर्‍या तिमाहीत दागिन्यांच्या विक्रीत अपेक्षित वाढ झाली आहे. तरीसुद्धा, आम्हाला विश्वास आहे की मार्केट शेअरमधील वाढ, मजबूत बॅलेन्सशीट, फ्रँचायझी-बेस्ड मॉडेल आणि प्रोडक्ट सेगमेंटमध्ये ओमनी चॅनलमुळे स्ट्रक्चरल स्टोरी कायम आहे. त्यामुळे शेअरमध्ये खरेदीचा सल्ला आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Share market, Tata group

    पुढील बातम्या