Elec-widget

नोकरी बदलल्यानंतर हे काम केलं नाहीत तर होईल नुकसान

नोकरी बदलल्यानंतर हे काम केलं नाहीत तर होईल नुकसान

नोकरी बदलल्यानंतर काही महत्त्वाची कादगपत्रं पूर्ण करणं गरजेचं असतं. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांनी नोकरी बदलल्यानंतर प्रॉव्हिडंड फंड ट्रान्सफर करणं महत्त्वाचं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : नोकरी बदलल्यानंतर काही महत्त्वाची कादगपत्रं पूर्ण करणं गरजेचं असतं. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांनी नोकरी बदलल्यानंतर प्रॉव्हिडंड फंड ट्रान्सफर करणं गरजेचं असतं. यामुळे टॅक्स बचतीत फायदा होतोच शिवाय निवृत्तीच्या वेळेला पेन्शनमध्येही लाभ मिळतो. PF ट्रान्सफर, एम्प्लॉयी पेन्शन स्कीम यासाठी एम्प्लॉयी प्रॉव्हिडंड फंडची मेम्बरशिप कायमची मानली जाते.

5 वर्षांच्या आत PF काढला तर...

तुम्ही जर 5 वर्षांच्या आत पैसे काढलेत तर तुम्हाला पीएफ विड्रॉअल वर कर भरावा लागेल. शिवाय इनकम टॅक्स अ‍ॅक्टच्या 80 C नुसार स्वत:च्या योगदानावर मिळणारा टॅक्स बचतीचा लाभही मिळू शकणार नाही. याउलट पीएफ ट्रान्सफर केला तर कराची बचत होईलच आणि निवृत्तीच्या वेळेस मिळणारी पेन्शनही तुम्हाला मिळू शकेल.

एखादी व्यक्ती 10 वर्षांपेक्षा जास्त काळ संस्थेत असेल आणि तिचं वय 58 वर्षांपेक्षा जास्त असेल तर निवृत्त झाल्यानंतर सेवानिवृत्ती पेन्शन मिळू शकेल.

पेन्शनसाठीची योग्यता कशी ठरवणार?

Loading...

कोणत्याही EFPO सदस्याची पेन्शन त्याने EPF मध्ये भरलेल्या पैशांवर अवलंबून असते. जर एखादी व्यक्ती 58 व्या वर्षी सेवानिवृत्त झाली आणि ती व्यक्ती 20 वर्षांपेक्षा जास्त काळ नोकरीत असेल तर त्या व्यक्तीची पेन्शनयोग्य सेवा 2 वर्षांसाठी वाढवली जाईल. या कारणांमुळेच नोकरी बदलल्यानंतर प्रॉव्हिडंड फंड ट्रान्सफर केला तर कराची बचत आणि पेन्शन या दोन्हीसाठी फायदेशीर ठरू शकतं.

=====================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: jobmoney
First Published: Nov 18, 2019 05:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...