दसरा-दिवाळीआधी SBIचं ग्राहकांना गिफ्ट! सोनं, गाडी खरेदी करताना आकरणार नाही 'हा' शुक्ल

दसरा-दिवाळीआधी SBIचं ग्राहकांना गिफ्ट! सोनं, गाडी खरेदी करताना आकरणार नाही 'हा' शुक्ल

SBI ग्राहक असाल तर गाडी किंवा सोनं खरेदी करण्याच्या तयारीला लागा, बॅंक देत आहे तुम्हाला खास गिफ्ट.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : देशभरात सुरू असलेल्या उत्सवाच्या हंगामात SBI नं आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर्स आणल्या आहेत. या ऑफरमध्ये बँक स्वस्तात गोल्ड, कार आणि वैयक्तिक कर्ज ग्राहकांना देत आहे. याशिवाय या सर्व कर्जावरील प्रक्रिया शुल्क बँकेने कमी केले आहे. एसबीआयच्या योनो अॅपच्या (YONO app) माध्यमातून, जे कर्ज घेतात त्यांना प्रक्रिया शुल्क भरावे लागणार नाही.

SBIने अधिकृत ट्विटर हँडलवर ट्वीट करुन या ऑफरबद्दल माहिती दिली आहे. बँकेने ट्वीटमध्ये लिहिले आहे की या उत्सवाच्या हंगामात सोने, कार व वैयक्तिक कर्जावर विशेष ऑफर येत आहेत. योनो अ‍ॅपद्वारे ग्राहक या कर्जासाठी अर्ज करु शकतात.

वाचा-तुमच्याकडे आहे 'ही' 10 रुपयांची नोट? घरबसल्या 25 हजार कमवण्याची संधी

कर्जाचे व्याज दर तपासा

SBI ने गोल्ड लोन (SBI Gold Loan) घेणाऱ्या ग्राहकांना किमान 7.5% व्याज दराने कर्ज देण्याची ऑफर दिली आहे. यात ग्राहकांना 36 महिन्यांसाठी गोल्ड लोन परतफेड करण्याची सुविधा मिळेल. सध्याच्या संकटात ग्राहकांना परवडणारी कर्जाची उपलब्धता पाहता एसबीआय 9.6 टक्के दराने वैयक्तिक कर्जाची ऑफर देत आहे. या व्यतिरिक्त कार लोनचा व्याज दर 7.5 टक्के आहे.

वाचा-फक्त 1 रुपया देणार तुमच्या कुटुंबाला सुरक्षा! अपघात झाल्यास मिळणार 2 लाख

बँक प्री-अप्रुव्ह कर्ज सुविधा देत आहे

याशिवाय बँक आपल्या ग्राहकांना Pre-approve पेपरलेस पर्सनल लोन देत आहे. डिजिटल बँकिंगची वाढती उपयुक्तता लक्षात घेऊन एसबीआयने आपल्या योनो अॅप युजरसाठी कार आणि सोन्याच्या कर्जासाठी पूर्व-मंजूर पेपरलेस कर्जाची व्यवस्था केली आहे.

वाचा-फक्त बिस्किट चाखण्यासाठी मिळणार 40 लाख रुपये पगार ; कंपनीने ऑफर केला हटके जॉब

कोणाला मिळणार सूट?

SBI ग्राहक केवळ 4 क्लिकमध्ये योनो अॅपवर प्री मंजूर पेपरलेस वैयक्तिक कर्ज घेऊ शकतात. या कर्जाच्या पात्रतेसाठी, आपल्या स्मार्टफोनमधून PAPL नंतर स्पेस आणि नंतर एसबीआय खाते क्रमांक 4 डिजिटमध्ये लिहून 567676 वर एसएमएस करावा लागेल.

Published by: Priyanka Gawde
First published: October 19, 2020, 12:56 PM IST
Tags: SBI

ताज्या बातम्या