गेल्या काही वर्षांत खासगी वाहनांच्या विक्रीमध्ये वाढ झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे अनेक कार उत्पादक कंपन्यांनी बाजारामध्ये नवनवीन गाड्या दाखल केल्या आहेत. सध्या भारतीय ऑटोमोबाइल मार्केटमध्ये अनेक अत्याधुनिक कार्स उपलब्ध आहेत. त्यापैकी हॅचबॅक आणि मायक्रो एसयूव्ही गाड्यांना ग्राहकांची अधिक पसंती मिळत आहे. 2023च्या दुसऱ्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये मार्केटमध्ये दोन एसयूव्ही, एमपीव्ही आणि इलेक्ट्रिक हॅचबॅकसह काही महत्त्वाच्या नवीन कार्स लाँच होणार आहेत. 'इंडिया कार न्यूज'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
मारुती सुझुकी ब्रेझा सीएनजी ही कार फेब्रुवारी 2023 मध्ये विक्रीसाठी मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे. कंपनीने आधीच आपल्या डीलरशिप्सना ही कार पाठवण्यास सुरुवात केली आहे. या वर्षीच्या ऑटो एक्स्पोमध्ये ही गाडी प्रदर्शित करण्यात आली होती. 1.5 एल के15सी पेट्रोल इंजिनसह आणि फॅक्टरी-फिट केलेल्या सीएनजी किटसह ही कार मिळेल. 88PS पॉवर आणि 121.5Nm टॉर्क मिळेल, असा दावा करण्यात आला आहे. कार निर्मात्यांचं म्हणणं आहे, की ब्रेझा सीएनजी 27. km/kg मायलेज देईल. यात मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही गिअरबॉक्स वापरता येऊ शकतो.
टोयोटा किर्लोस्कर मोटरनं अपडेट केलेल्या इनोव्हा क्रिस्टा डिझेल मॅन्युअल मॉडेलसाठी देशभरात बुकिंग स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. या गाडीची किंमत फेब्रुवारीमध्ये जाहीर केली जाईल आणि डिलिव्हरी एप्रिलच्या उत्तरार्धात सुरू होईल. या गाडीचं अद्ययावत मॉडेल लाइनअप, जी, जीएक्स, व्हीएक्स आणि झेडएक्स या चार ग्रेडमध्ये उपलब्ध असेल. त्यात 2.4 लिटर डिझेल इंजिन असेल. ही एमपीव्ही गाडी सात आणि आठ सीट्सच्या दोन्ही कॉन्फिगरेशनसह मिळेल. गाडीमध्ये आठ-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 8-वे पॉवर अॅडजस्ट ड्रायव्हर सीट, सात एअरबॅग्ज, एबीएस, ईबीडी, व्हीएससी, हिल स्टार्ट असिस्ट इत्यादी फीचर्स असतील. एकूण पाच रंगांमध्ये ही गाडी मार्केटमध्ये येणार आहे.
सर्वात स्वस्त अन् दमदार SUV! बघणारे तुमच्यावर जळतंच राहतील
सीट्रॉन ईसी3 ही कार, फ्रेंच ऑटोमेकर कंपनीची भारतातली पहिली मास-मार्केट इलेक्ट्रिक ऑफर असेल. या मॉडेलमध्ये 29.2kWh बॅटरी पॅक असेल आणि समोरच्या एक्सलवर इलेक्ट्रिक मोटर बसवलेली असेल. कारचा सेटअप 57PS ची पीक पॉवर आणि 143Nm टॉर्क वितरित करतो. गाडी पूर्ण चार्ज केल्यावर 320 किलोमीटर्सची रेंज देते. गाडी दोन ड्राइव्ह मोडसह मिळेल. सीट्रॉनची नवीन इलेक्ट्रिक हॅच लाइव्ह अँड फील ट्रिममध्ये टाटा टियागो ईव्हीशी स्पर्धा करेल. कारच्या फीचर किटमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह 10.2-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टीम, हाइट-अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, ड्युएल फ्रंट एअरबॅग्ज आणि इतर अनेक फीचर्सचा समावेश आहे.
2014 मध्ये खरेदी केली कार अन् 2023 मध्ये समोर आलं असं सत्य की...
ह्युंदाईची लोकप्रिय सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही कार फेब्रुवारी 2023 च्या सुरुवातीला मिड-लाइफ अपडेट प्राप्त करणार असल्याचं म्हटलं जात आहे. ही गाडी ई, एस, एस(ओ), एसएक्स आणि एसएक्स (ओ) या पाच प्रकारामध्ये उपलब्ध केली जाईल. नवीन 2023 ह्युंदाई व्हेन्यू फेसलिफ्टमध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिन असण्याची शक्यता आहे. त्यांची क्षमता 1.2 लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल, 1.0 लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझेल अशी असेल. डिझेल मोटर सध्याच्या युनिटपेक्षा थोडी अधिक शक्तिशाली असेल. अपडेट केलेली व्हेन्यू एन-लाइन N6 आणि N8 या प्रकारांमध्ये येईल. त्यामध्ये 1.0लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Car