30 नोव्हेंबरआधी करा 'ही' 5 महत्त्वाची कामं, अन्यथा भरावा लागेल दंड

30 नोव्हेंबरआधी करा 'ही' 5 महत्त्वाची कामं, अन्यथा भरावा लागेल दंड

1 डिसेंबरपासून बरेच नवे नियम लागू होत आहेत. यापैकी काही महत्त्वाचे नियम हे आर्थिक व्यवहारांशी संबंधीत आहेत.

  • Share this:

मुंबई, 24 नोव्हेंबर: नोव्हेंबर महिना संपण्यासाठी फक्त काही दिवसांचाच अवधी शिल्लक आहे. त्याआधी म्हणजेच 30 नोव्हेंबरआधी काही महत्त्वाची कामं तुम्ही जर केली नसतील तर ती या दोन दिवसांमध्ये करून घ्या. अन्यथा तुमचे पैसे अडकण्याची चिन्हं आहेत.30 तारीनंतर एसबीआयच्या नियमांपासून ते विमा कंपन्यांच्या नियमात अनेक बदल होणार आहेत. त्यासोबतच पंतप्रधान किसान समन्मान निधी योजनेचे नियम बदलणार आहेत. त्यामुळे तुम्ही या योजनेसाठी तुमचा आधारकार्ड नंबर दिला नसेल तर तो आताच देणं बंधनकारक आहे. अन्यथा तुम्हाला त्या योजनेचा लाभ घेताना अनेक अडथळे येऊ शकतात.

1. लाइफ सर्टिफिकेट जमा करणं गरजेचं.

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुम्ही जर पेन्शनधारक असाल तर 30 नोव्हेंबर 2019 आधी तुम्हाला Life Certificate submission last date 30th November 2019 बँकेत सादर करणं आवश्यक आहे. सर्टिफिकेट जमा न केल्यास तुमचं पेन्शन अडवलं जाणार आहे. देशातील सर्वाधिक पेन्शनधारक हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे खातेधारक आहेत. त्यामुळे त्यांना पेन्शन घेण्यासाठी हे सर्टिफिकेट जमा करणं आवश्यक आहे. बँकेच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार जवळपास 36 लाख पेन्शन खाती या बँकेत आहेत. त्यामुळे तुम्ही सर्टिफिकेट सादर केलं नसेल तर तातडीनं करा आणि आपलं पेन्शन रोखलं जाणार नाही याची काळजी घ्या.

2. 15 टक्क्यांपर्यंत महाग होणार नवी विमा पॉलिसी

विमा विनियामक आणि विकास प्राधिकरण इरडाने नॉन लिंक्ड आणि लिंक्ड विमा पॉलिससाठी 1 जुलैपासून नवे नियम लागू केले होते. या नियमांनुसार     1 डिसेंबर 2019 पासून विमा कंपन्या आपल्या नियमांमध्ये काही बदल करणार आहेत. 1 डिसेंबरनंतर नवीन विमा पॉलिसच्या प्रीमियममध्ये 15 टक्क्यांनी वाढ होणार आहे. तुम्ही 30 नोव्हेंबरपर्यंत पॉलिसी काढणार असाल तर तुम्ही जुन्या नियमानुसार प्रीमियम भरू शकता मात्र त्यानंतर पॉलिसी काढली तर 15 टक्के जास्त प्रीमियम भरावा लागणार आहे.

3. पंतप्रधान मोदी किसान समन्मान निधीचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड नंबर लिंक करणं गरजेचं

मोदी सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचं आधारकार्ड लिंक करणं आवश्यक आहे. तुम्ही आधारकार्ड लिंक केलं नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार नाही. आधार नंबर लिंक करण्यास विलंब केला तर योजनेतर्फे येणारे 6000 रुपये तुम्हाला मिळणार नाहीत.जम्मू-कश्मीर (Jammu and Kashmir), लडाख, असम आणि मेघालय इथल्या शेतकऱ्यांनी याची मुदत 31 मार्च 2020 पर्यंत वाढवून देण्यात आली आहे. ही राज्य वगळता सर्व राज्यांमध्ये 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत अंतिम असणार आहे. त्यामुळे तुम्हाला PMAY योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर न विसरता या 7 दिवसांमध्ये आधार लिंक करा.

4. LIC पॉलिसी रिवाइव करण्याची अंतिम मुदत वाढली.

तुम्ही जर एलआयसी कंपनीचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी हा बदल महत्त्वाचा असणार आहे. LIC 30 नोव्हेंबरनंतर 24हून अधिक पॉलिसी बंद करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्या पॉलिसीसंदर्भात आवश्यक ती माहिती नजीकच्या एलआयसी ऑफिसमधून घ्या. अन्यथा तुमचे पैसे अडकण्याची शक्यता आहे. इंशुरन्स रेगुलेटरी IRDA ची लाइफ इंशुरन्स प्रोडक्टच्या नव्या गाइलसाईनुसार  LIC आपल्या काही जुन्या पॉलिसी बंद करणार आहे.

5. इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख

CBDT ने केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर आणि लडाखला आयटी रिटर्न भरण्याची तारीख वाढवून दिली होती. त्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर आहे. 370 कलम रद्द झाल्यानंतर तिथली इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली होती. त्यामुळे पुन्हा सेवा पूर्ववत करण्यासाठी अवधी देण्यात आला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर आयटीरिटर्न भरण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली होती. अडीच लाखांच्यावर उत्पन्न असणाऱ्यांना आयटी रिटर्न भरणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही जर आयटी रिटर्न भरलं नसेल तर या आठवड्यात आवश्य भरा अन्यथा दंड भरावा लागेल.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 20, 2019, 8:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading