Home /News /money /

25 पैशांचं हे नाणं घरबसल्या बनवेल लखपती, जाणून घ्या प्रोसेस

25 पैशांचं हे नाणं घरबसल्या बनवेल लखपती, जाणून घ्या प्रोसेस

तुमच्याजवळ हे विशिष्ट प्रकारचं 25 पैशाचे नाणं असेल, तर ते तुम्हाला दीड लाखापर्यंत कमाई करून देऊ शकतं.

नवी दिल्ली, 17 जून : आजच्या काळात जुनी नाणी (Old Coins) आणि नोटा (Notes) यांना मोठी किंमत मिळते. नाणी किंवा नोटा जितक्या जुन्या असतील तितकी त्यांना अधिक किंमत मिळते. तुम्हाला जुनी नाणी, नोटा जमा करण्याचा छंद असेल आणि तुमच्या संग्रहात अशी काही दुर्मीळ नाणी, नोटा असतील तर ते विकून तुम्ही लाखो रुपये मिळवू शकता. आता याची विक्री करणंही सोपं झालं आहे. घरबसल्या तुम्ही ऑनलाइन पद्धतीनं यांची विक्री करू शकता. आपल्या देशात अगदी जुन्या काळात आणेली, ढबू पैसा, भोकाचा पैसा अशी नाणी चलनात होती. नंतर पाच पैसे, दहा पैसे, वीस पैसे, 25 पैसे आणि 50 पैसे तसंच एक रुपयाचं नाणं चलनात आलं. नंतर नोटा आल्या. कालांतराने नवीन नाणी, नोटाही आल्यानं, काही जुनी नाणी, नोटा चलनातून बाद झाल्या. सध्याच्या काळात एक रुपया, दोन रुपये, पाच आणि दहा रुपयाची नाणी चलनात आहेत. साधारण 2011 च्या सुमारास 25 पैसे, 50 पैसे या नाण्यांचा ट्रेंड संपला. सरकारने नाण्यांचा वापर थांबवण्यापूर्वीच लोकांनी याचा वापर थांबवला होता. त्यामुळे आताच्या काळात ही नाणी निरुपयोगी आहेत, पण हीच नाणी लक्षाधीश बनवू शकतात.

(वाचा - Facebook वर पोस्ट केला अश्लील कंटेंट, Apple ला करावी लागली लाखो रुपयांची भरपाई)

तुमच्याजवळ हे विशिष्ट प्रकारचं 25 पैशाचे नाणं असेल, तर ते तुम्हाला दीड लाखापर्यंत कमाई करून देऊ शकतं. तुमच्याकडे 25 पैशांचं (25 Paise) सिल्व्हर कलरचं नाणं (Silver Colour Coin) असेल ज्यावर गेंड्याचा छाप असेल, तर ते नाणं तुम्ही ऑनलाईन विकून लक्षाधीश होऊ शकता. इंडिया मार्ट डॉट कॉमसह (India mart .com) ओएलएक्ससारखे काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म दुर्मीळ नाणी, नोटा विक्रीसाठी काम करतात. इंडियामार्टवर जुनी नाणी, नोटा यांचा लिलाव (Auction) आयोजित केला जात आहे. इथे तुम्ही तुमच्याकडे हे 25 पैशांचं नाणं असेल, तर ते विकू शकता. याकरता त्या नाण्याचे दोन्ही बाजूंनी फोटो काढून ते या वेबसाईटवर अपलोड करावे लागतील. त्यानंतर दुर्मीळ नाणी, नोटा खरेदी करू इच्छिणारे लोक त्यावर बोली लावतील. जे सर्वात जास्त पैसे देऊ करतील त्यांना तुम्ही हे नाणं विकू शकता.

(वाचा - विद्यार्थ्याने Instagram मध्ये सांगितली मोठी त्रुटी,Facebookने दिले 22 लाख रुपये)

पाच आणि दहा पैशांच्या नाण्यांसाठीही बोली - आजकाल पाच (5 Paise) आणि दहा पैशांच्या (10 Paise) नाण्यांचीही मागणी वाढली आहे. 2002 मध्ये आलेल्या या नाण्यांवर माता वैष्णोदेवीची मुद्रा छापलेली असेल, तर या नाण्यांनाही मोठी किंमत मिळू शकते. त्यामुळे तुमच्याकडे अशी नाणी असतील तर तीही तुम्ही या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विकू शकता आणि मोठी कमाई करू शकता.
Published by:Karishma Bhurke
First published:

पुढील बातम्या