निवडणुकीच्या निकालानंतर कार-बाइक चालवणं होणार महाग, जाणून घ्या कारणं

निवडणुकीच्या निकालानंतर कार-बाइक चालवणं होणार महाग, जाणून घ्या कारणं

कार, बाइक चालवणं आता आणखी महाग होणार आहे. आणि हा खर्च अनिवार्य आहे.

  • Share this:

मुंबई, 21 मे : चालू  आर्थिक वर्षात कार आणि दोन चाकी वाहनांचा प्रीमियम वाढणार आहे. भारतीय विमा नियामक म्हणजेच विकास प्राधाकरण (IRDAI)नं 2019-20 साठी थर्ड पार्टी ( टीपी )च्या मोटर विमा प्रीमियमचे दर वाढवण्याचा प्रस्ताव दिलाय. IRDAIचं म्हणणं आहे की इन्शुरन्स इन्फाॅर्मेशन ब्युरो आॅफ इंडिया ( IIBI )कडून मिळालेल्या आकडेवारीनुसार मोटर टीपी प्रीमियम दर नक्की केला जातो.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर उद्या मेगा ब्लॉक, या वेळेत बंद राहणार वाहतूक

कारसाठी किती वाढणार प्रीमियम?

या माहितीनुसार 1 हजार सीसी कमी क्षमतेच्या कार्सचा थर्ड पार्टी विमा प्रीमियम 1,850 रुपयांवरून 2,120 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. 1000 सीसी आणि 1500 सीसीच्या मधे असलेल्या कार्सचा प्रीमियम 2,863 रुपयांवरून 3,300 रुपये करण्याचा प्रस्ताव दिलाय. सध्या 1500 सीसी इंजिनाच्या लक्झरी कार्सच्या प्रीमियममध्ये बदल केलेला नाही. तो 7,890 रुपयेच आहे.

Zomato ची खास ऑफर, पंतप्रधानांचं नाव सांगा आणि...

स्कुटर/ बाइकसाठी किती वाढणार प्रीमियम?

75 सीसीहून कमी क्षमता असलेल्या दोन चाकी वाहनांचा थर्ड पार्टी प्रीमियम 427 रुपयांहून 482 रुपयांवर करण्याचा प्रस्ताव आलाय. याबरोबर 75 सीसीपासून 350 सीसीपर्यंत वाढीचा प्रस्ताव केलाय. पण 350 सीसीहून जास्त असलेल्या सुपरबाइकबाबत काही बदल केला नाही.

या ड्राफ्टनुसार सिंगल प्रीमियम दरात काही बदल केलेला नाही. नव्या कारचा सिंगल प्रीमियम दर 3 वर्षांसाठी आणि नव्या दोन चाकी वाहनांसाठी 5 वर्षांचा आहे.

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार का? काय म्हणतोय सट्टाबाजार

इलेक्ट्रिक वाहनांसाठी मिळेल 15 टक्के सूट

इरडानं इलेक्ट्रिक कार आणि इलेक्ट्रिक दोन चाकी वाहनांसाठी मोटर थर्ड पार्टी प्रीमियम दर 15 टक्के डिस्काउंट द्यायचा प्रस्ताव मांडलाय. ई रिक्षासाठी थर्ड पार्टी दर वाढणार नाही. स्कूल बसचा प्रीमियम वाढू शकतो. टॅक्सी, बस आणि ट्रकसाठी प्रीमियम दर वाढवण्याचा प्रस्ताव आहे. तसाच तो  ट्रॅक्टरचाही वाढेल.

काय आहे थर्ड पार्टी इन्शुरन्स?

वाहन इन्शुरन्स 2 प्रकारे असतात. पर्सनल अॅक्सिडेंट कव्हर आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स. भारतीय रस्ता सुरक्षा कायद्यानुसार थर्ड पार्टी इन्शुरन्स अनिवार्य आहे. थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये प्राॅपर्टी नुकसान, दुखापत किंवा मृत्यू या गोष्टी कव्हर होतात. यात कुठल्याही गाडीचा ड्रायव्हर, कारचा प्रवासी, दुसऱ्या कारचा प्रवासी येतो.

VIDEO : वर्ल्डकपसाठी काय आहे टीमचा प्लॅन? विराट कोहलीची UNCUT पत्रकार परिषद

First published: May 21, 2019, 5:27 PM IST
Tags: Insurance

ताज्या बातम्या