घर खरेदी करताय... तर हे एकदा वाचाच

घर खरेदी करताय... तर हे एकदा वाचाच

आज आम्ही तुम्हाला अशाच महत्त्वपूर्ण गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या घर खरेदीपूर्वी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे.

  • Share this:

रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी हा चांगला काळ आहे. कारण प्रॉपर्टीच्या किंमती मोठ्या प्रमाणात घसरल्या आहेत. त्यामुळे या संधीचा फायदा उचलत तुम्ही रिअल इस्टेटमध्ये नक्कीच गुंतवणूक करू शकता. मात्र घर खरेदी करणं वाटतं तितकं सोप्पं नाही. गृहखरेदी पूर्वी अनेक गोष्टींचा विचार करणं गरजेचं असतं. गृहखरेदी करणं म्हणजे आयुष्याच्या जमापुंजीचा मोठा वाटा यात गुंतवणं. आज आम्ही तुम्हाला अशाच महत्त्वपूर्ण गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या घर खरेदीपूर्वी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे.

बिल्डरची विश्वासहार्यता- घर खरेदी करताना सर्वात आधी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची तर ती म्हणजे बिल्डरची विश्वासहार्यता. बिल्डरच्या जुन्या रेकॉर्डवर नजर टाकणं आवश्यक आहे. तसेच त्याची आर्थिक स्थिती चांगली आहे की नाही याची चौकशी करणंही आवश्यक आहे. यातून बिल्डर तुम्हाला वेळेत घर देऊ शकेल की नाही हे कळतं. अनेकदा गृहप्रकल्पांना विलंब झाल्यांचे आपण वाचतो. त्यामुळे तुम्ही ज्या इमारतीत घर घेत आहात त्या इमारतीच्या बिल्डरची योग्य चौकशी करणं आवश्यक आहे.

मान्यता आणि लायसन्स- तुम्ही ज्या परिसरात घर घेत आहात ते घर अधिकृत ठिकाणी बांधण्यात आलं आहे की नाही याची चौकशी करणंही आवश्यक आहे. प्रशासनाने इमारती बांधणीला परवानगी दिली आहे की नाही याची माहिती असणं फार आवश्यक आहे. बिल्डरकडे प्रोजेक्ट संदर्भातील टायटल डीड, रिलीज सर्टिफिकेट, प्रॉपर्टी टॅक्स रिसिटी आणि फायर अप्रुवल असणं आवश्यक आहे. ही कागदपत्र फार आवश्यक आहेत. यासोबतच जमिनीच्या वापरासाठी रेरा सर्टिफिकेट बिल्डरकडे आहे की नाही ते पडताळले पाहीजे.

प्रॉपर्टीची किंमत- तुमच्या घराची मुळ किंमत वाढवणाऱ्या अनेक गोष्टी असता. यात अंतर्गत- बाह्य डेव्हलपमेन्ट फी, पार्किंग, क्लब, स्टॅट्युटरी फी, योग्य घर पसंतीचा दर अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. या सगळ्या गोष्टींच्या किंमतींमुळे मूळ घराची किंमत वाढवते. त्यामुळे घर खरेदी करताना बिल्डरशी या सर्व गोष्टींबद्दल आधीच बोलून घ्या. घराची रक्कम देताना कोणतीही ‘हिडन कॉस्ट’ तुम्हाला द्यावी लागणार नाही.

प्रकल्पाचं ठिकाण आणि देण्यात येणाऱ्या सुविधा- प्रकल्पाचं ठिकाणावरून घराची किंमत कमी की जास्त ते ठरतं. यामुळे तुमच्या घराचं प्रकल्प सोयीसुविधांपासून किती लांब किंवा जवळ आहे याचा विचार करून बिल्डरने सांगितलेली घराची रक्कम योग्य आहे की नाही याचा आधीच विचार करा.

इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅन- मेट्रो कनेक्टिव्हिटी असो किंवा इतर महत्त्वपूर्ण सार्वजनिक सुविधा जवळ आहेत का याचाही घर घेण्यापूर्वी विचार करा. आपण घेतलेल्या प्रॉपर्टीचे भविष्यात भाव वाढतो. त्यामुळे जर घर विकण्याचा भविष्यात निर्णय घेतला तर त्याचा चांगला भाव येईल की नाही याचा गुंतवणूक करण्यापूर्वीच विचार करा. सार्वजनिक सुविधांपासून लांब असलेल्या घरांना अनेकदा चांगला भाव मिळत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 27, 2018 12:09 PM IST

ताज्या बातम्या