मराठी बातम्या /बातम्या /मनी /Tax Saving Tips: कष्टाच्या पैशावरील टॅक्स कसा वाचवाल? 'या' टिप्स फॉलो करा जास्तीत जास्त बचत शक्य

Tax Saving Tips: कष्टाच्या पैशावरील टॅक्स कसा वाचवाल? 'या' टिप्स फॉलो करा जास्तीत जास्त बचत शक्य

Tax Saving: आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच कर नियोजन करावे. ही सर्वात महत्वाची पद्धत आहे जी कोणत्याही गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा मिळवण्यासाठी केली जाऊ शकते. परताव्यावर बचत करताना कर नियोजन खूप महत्त्वाचे आहे.

Tax Saving: आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच कर नियोजन करावे. ही सर्वात महत्वाची पद्धत आहे जी कोणत्याही गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा मिळवण्यासाठी केली जाऊ शकते. परताव्यावर बचत करताना कर नियोजन खूप महत्त्वाचे आहे.

Tax Saving: आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच कर नियोजन करावे. ही सर्वात महत्वाची पद्धत आहे जी कोणत्याही गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा मिळवण्यासाठी केली जाऊ शकते. परताव्यावर बचत करताना कर नियोजन खूप महत्त्वाचे आहे.

मुंबई, 14 मे : कष्टाने कमावलेला पैसा टॅक्समध्ये (Income Tax) जावा अशी कुणाचीही इच्छा नसते. तुम्ही कराचा बोजा कमी करण्याचा आणि गुंतवणुकीवर (Investment) परतावा वाढवण्याचा प्रयत्न करू शकता. करबचतीचे उपाय (Tax Saving Options) करण्यासोबतच गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा कसा मिळवावा हे देखील जाणून घेतले पाहिजे. येथे काही टिप्स आहेत ज्या तुम्हाला गुंतवणूक करताना कर वाचवून तुमचा परतावा वाढवण्यात मदत करतील.

आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच कर नियोजन करावे. ही सर्वात महत्वाची पद्धत आहे जी कोणत्याही गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा मिळवण्यासाठी केली जाऊ शकते. परताव्यावर बचत करताना कर नियोजन खूप महत्त्वाचे आहे, यावर तज्ञ सहमत आहेत. जर तुम्ही पीपीएफ, ईएलएसएस सारख्या कर बचत साधनांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला गुंतवणूक करणे चांगले.

mAadhaar App: कुटुंबातील सर्वांचं आधार कार्ड प्रोफाईल एकाच ठिकाणी करा सेव्ह; चेक करा संपूर्ण प्रोसेस

उत्पन्नाचे एकत्रीकरण टाळण्यासाठी तुम्ही तुमचे पालक, आजी आजोबा आणि जोडीदार यांच्या नावे गुंतवणूक करू शकता, ज्यांना कदाचित कमी कर असेल. जर तुमच्या पालकांपैकी एकाचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि त्यांची कोणतीही गुंतवणूक नसेल, तर तुम्ही त्यांच्या नावावर करमुक्त व्याजासाठी गुंतवणूक करू शकता. 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना आधीच 3 लाख रुपयांची बेसलाइन सूट मिळू शकते. याशिवाय जर तुम्ही 80 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आजी-आजोबांच्या नावावर गुंतवणूक केली तर सूट मर्यादा 5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

मुलांची देखील मदत होऊ शकते

तुमची मुले देखील कर वाचवण्यात मदत करू शकतात, परंतु जर त्याचे वय 18 वर्ष होईपर्यंतच. प्रौढ झाल्यानंतर मुलाला कर प्रकरणात स्वतंत्र व्यक्ती म्हणून वागणूक दिली जाते. तो डिमॅट खाते (Demat Account) उघडण्यास, स्टॉक आणि म्युच्युअल फंडांमध्ये तुमच्या पैशातून गुंतवणूक करण्यास पात्र असेल. 1 लाख रुपयांपर्यंतचा दीर्घकालीन भांडवली नफा दरवर्षी करमुक्त असेल, तर अल्प मुदतीचा भांडवली नफा दरवर्षी 2.5 लाख रुपयांच्या मानक सूटपर्यंत करमुक्त असेल.

Health Insurance घेताना 'या' गोष्टी तपासून घ्या, अन्यथा गरजेच्या वेळी होईल मनस्ताप

PPF, NPS हे चांगले पर्याय

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी सेवानिवृत्ती बचत योजना (Retirement Saving Plan) आहे. निवृत्तीनंतर सर्वांना सुरक्षित जीवन प्रदान करणे हा त्याचा उद्देश आहे. PPF मध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा 1.5 लाख आहे. या रकमेवर तुम्हाला कर सूट मिळते. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) देखील एक वेगळा करमुक्त पर्याय आहे.

First published:
top videos

    Tags: Income tax, Money, Tax