या सरकारी बचत योजना तुम्हाला देतील चांगला फायदा, इथे गुंतवा पैसे

या सरकारी बचत योजना तुम्हाला देतील चांगला फायदा, इथे गुंतवा पैसे

तुम्ही सेव्हिंग करता की नाही ? हा प्रश्न आपल्याला वारंवार विचारला जातो. आपले पैसे जर चांगल्या बचत योजनांमध्ये गुंतवले तर त्याचा फायदा होतो. त्यातही सरकारी बचत योजना या खात्रीच्या असतात. त्यात फसवलं जाण्याची किंवा गुंतवणूक वाया जाण्याची शक्यता कमी असते. या आहेत काही सरकारी बचत योजना.

  • Share this:

मुंबई, 26 जुलै : तुम्ही सेव्हिंग करता की नाही ? हा प्रश्न आपल्याला वारंवार विचारला जातो. आपले पैसे जर चांगल्या बचत योजनांमध्ये गुंतवले तर त्याचा फायदा होतो. त्यातही सरकारी बचत योजना या खात्रीच्या असतात. त्यात फसवलं जाण्याची किंवा गुंतवणूक वाया जाण्याची शक्यता कमी असते.बचत योजनांमध्ये गुंतवलेले पैसे हे मुलांचं शिक्षण, लग्नकार्य, अचानक आलेला हॉस्पिटलचा खर्च यासाठी उपयोगी पडतात. जर एकदम काही रक्कम हवी असेल तर बचत कामाला येते. म्युच्युअल फंडांपेक्षाही सरकारी बचत योजनांमध्ये तुम्ही पैसे गुंतवलेत तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो.

या आहेत सरकारी बचत योजना

१. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट - यामध्ये पैसे गुंतवले तर 8 टक्के व्याज आहे आणि यासाठी मुदत आहे 5 ते 10 वर्षांची.

२. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड -  या योजनेत 8 टक्के व्याज आहे तर 5 ते 10 वर्षांची मुदत आहे.

३. व्हॉलिंटरी प्रॉव्हिडंट फंड - यासाठी 8.65 टक्के व्याज आहे आणि मुदत कमीत कमी 5 वर्षांची आहे.

4. नॅशनल पेन्शन स्कीम - ही योजना वयाच्या 60 व्या वर्षी पूर्ण होते. यात जेवढे पैसे गुंतवाल त्या प्रमाणात पैसे मिळतात.

5. पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट या योजनेसाठी 4 टक्के व्याज आहे.

6. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट -  यावरचं व्याज मुदतीनुसार बदलतं आणि यात एक ते पाच वर्षांची मुदत आहे.

(हेही बघा... VIDEO: लोकसभेत नवनीत राणा भडकल्या, आझम खान यांच्या वक्तव्यावरून गोंधळ )

7. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट अकाउंट - या योजनेसाठी 7. 3 टक्के व्याज आहे आणि 5 वर्षांची मुदत आहे.

8. पोस्ट ऑफिस मन्थली इनकम स्कीम - या बचत योजनेत 7.7 टक्के व्याज आहे आणि 5 वर्षांची मुदत आहे.

9. अटल पेन्शन योजना - 8 टक्के व्याज - या योजनेत तुम्ही कोणत्या वयात पैसे गुंतवता त्यावर त्याचे रिटर्न्स अवलंबून आहेत.

10. सुकन्या समृद्धी योजना - 8.5 व्याज -  मुलगी 21 वर्षांची झाली की या योजनेत गुंतवलेले पैसे मिळतात किंवा मुलीच्या लग्नासाठीही पैसे मिळू शकतात.

11. किसान विकास पत्र - या योजनेत 7.7 टक्के व्याज आहे आणि मुदत आहे 118 महिन्यांची.

12. सीनिअर सिटिझन्स सेव्हिंग स्कीम - यामध्ये गुंतवलेल्या पैशावर 8.7 टक्के व्याज मिळतं आणि या योजनेची मुदत पाच वर्षांची आहे.

===========================================================================================

VIDEO: ट्रॅफिक कंट्रोल करणाऱ्या या आजीबाई नक्की आहेत तरी कोण?

Published by: Arti Kulkarni
First published: July 26, 2019, 4:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading