मराठी बातम्या /बातम्या /मनी /

बँकेत FD करायची आहे? जाणून घ्या कुठली सरकारी बँक देते सर्वाधिक व्याज

बँकेत FD करायची आहे? जाणून घ्या कुठली सरकारी बँक देते सर्वाधिक व्याज

Government Bank FD Interest Rate: सर्वसामान्य नागरिक एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. कारण, एफडीच्या माध्यमातून नागरिकांना परताव्याची हमी असते.

Government Bank FD Interest Rate: सर्वसामान्य नागरिक एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. कारण, एफडीच्या माध्यमातून नागरिकांना परताव्याची हमी असते.

Government Bank FD Interest Rate: सर्वसामान्य नागरिक एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. कारण, एफडीच्या माध्यमातून नागरिकांना परताव्याची हमी असते.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 11 एप्रिल: बँकेत एफडी (Fixed Deposit) करणे हा गुंतवणुकीचा एक पर्याय (Investment option) आहे. आजही अनेक नागरिक हे गुंतवणूक करण्यासाठी बँकेतील फिक्स डिपॉझिटला प्राधान्य देतात. कारण, त्यामधून परताव्याची ग्राहकांना हमी दिली जाते. एफडीच्या माध्यमातून ग्राहकांना सेव्हिंग अकाऊंटहून अधिक परताव मिळतो. चला तर मग जाणून घेऊयात सर्वात चांगला व्याज देणाऱ्या टॉप 10 सरकारी बँक (Government Banks) कुठल्या आहेत.

युनियन बँक देते सर्वाधिक व्याज

एफडीवर सर्वाधिक व्याज युनियन बँक (Union Bank) देत आहे. लॉन्ग टर्म एफडीवर युनियन बँक 5.60 टक्के व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.10 टक्के व्याज दर देत आहे.

कॅनरा बँक

जास्त व्याज दर देणाऱ्या बँकेच्या यादीत कॅनरा बँक दुसऱ्या क्रमांकावर आहे. Canara Bank लॉन्ग टर्म एफडीवर 5.50 टक्के व्याज दर देते. तर जेष्ठ नागरिकांना 6 टक्के व्याज दर देत आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया

तिसऱ्या क्रमांकावर भारतीय स्टेट बँक (State Bank of India) आहे. एसबीआय आपल्या ग्राहकांना 5.40 टक्के व्याज देत आहे. तर जेष्ठ नागरिकांना 6.20 टक्के दराने व्याज देत आहे.

हे पण वाचा: छोट्या बचतीची मोठी कमाल; 5 वर्षात लाखोंचा फंड देईल ही स्कीम, पैसाही राहील सुरक्षित

बँक ऑफ इंडिया

Bank of India आपल्या ग्राहकांना एफडीवर 5.30 टक्के व्याज दर देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 5.80 टक्के व्याज दर देत आहे.

पंजाब नॅशनल बँक

पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) एफडीवर 5.30 टक्के व्याज दर देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 5.80 टक्के व्याज दर देत आहे.

पंजाब अँण्ड सिंध बँक

Punjab and Sindh Bank लॉन्ग टर्म फिक्स्ड डिपॉझिटवर 5.25 टक्के व्याज दर देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 5.75 टक्के व्याज दर देत आहे.

हे पण वाचा: फक्त एकदा पैसे भरा आणि आयुष्यभर दरमहा 8000 रुपये मिळवा; LIC ची खास पॉलिसी

बँक ऑफ बडोदा

एफडीवर बँक ऑफ बडोदा सुद्धा 5.25 टक्के व्याज दर देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 5.75 टक्के व्याज दर देत आहे.

इंडियन ओवरसीज बँक

इंडियन ओवरसीज बँक (Indian Overseas Bank) आपल्या ग्राहकांना दीर्घ मुदतीच्या एफडीवर 5.20 टक्के व्याज दर देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर0.5 टक्के अधिक व्याज दर देत आहे.

इंडियन बँक

इंडियन बँक (Indian Bank) आपल्या ग्राहकांना एफडीवर 5.15 टक्के व्याज दर देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर0.5 टक्के अधिक व्याज दर देत आहे.

IDBI Bank

आयडीबीआय बँक आपल्या ग्राहकांना लॉन्ग टर्म फिक्स्ड डिपॉझिटवर 5.10 टक्के व्याज दर देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर0.5 टक्के अधिक व्याज दर देत आहे.

First published:

Tags: Fixed Deposit, Sbi fd rates