1 डिसेंबरपासून बदलणार सामान्य माणसाबद्दलच्या या 4 गोष्टी, तुमच्या खिशावर होणार परिणाम

1 डिसेंबरपासून बदलणार सामान्य माणसाबद्दलच्या या 4 गोष्टी, तुमच्या खिशावर होणार परिणाम

1 डिसेंबरपासून 4 गोष्टी बदलणार आहेत. त्या तुमच्या खिशावर थेट परिणाम करू शकतात. यामध्ये LIC, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, मोबाइलचे दर या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : 1 डिसेंबरपासून 4 गोष्टी बदलणार आहेत. त्या तुमच्या खिशावर थेट परिणाम करू शकतात. यामध्ये LIC, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, मोबाइलचे दर या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे.

1. आधार कार्ड लिंक करणं गरजेचं

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर आहे. शेतकऱ्यांसाठी असलेला 6 हजार रुपयांचा निधी मिळवण्यासाठी हे आधार कार्ड लिंक करणं महत्त्वाचं आहे. असं असलं तरी काश्मीर, लडाख, आसाम, मेघालय या राज्यांत शेतकऱ्यांना यासाठी 31 मार्च 2020 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

2. मोबाइलवर बोलणं होणार महाग

1 डिसेंबरपासून मोबाइलचे दर वाढणार आहेत. मोबाइलसोबत इंटरनेटचा वारपरही महाग होणार आहे. टेलिकॉम कंपन्या टेरिफ प्लॅन वाढवण्याच्या तयारीत आहे. टेलिकॉम क्षेत्रावर कर्जाचा बोजा आहे. त्यामुळे मोबाईलचे दर वाढणार आहेत.

(हेही वाचा : भगव्या फेट्यातल्या आदित्य ठाकरेंनी विधानसभेत असं घेतलं नाव)

3. विम्याच्या नियमांत बदल

लाइफ इन्शुरन्स म्हणजेच विम्याच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. तुम्ही जर विम्याची पॉलिसी घेणार असाल तर नव्या नियमांनुसार विम्याचा हप्ता थोडा महाग होऊ शकतो. पण हप्ता महाग झाला तरी ग्राहकांना चांगला फायदा मिळेल. त्यामुळे तुम्ही नवी पॉलिसी घेणार असाल तर थोडी वाट पाहा.

4. LIC च्या प्लॅन्समध्ये बदल

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 1 डिसेंबर 2019 पासून आपले प्लॅन्स आणि प्रपोझल फॉर्ममध्ये बदल करणार आहे. इन्शुरन्स रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाची नवी मार्गदर्शक तत्त्वं लागू झाल्यानंतर LIC चे नवे प्लॅन्स आणि प्रपोझल फॉर्म आणखी सर्वंकष होणार आहेत.

=================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 30, 2019 03:58 PM IST

ताज्या बातम्या