मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Saving Accounts वर 7 टक्के व्याज हवंय? 'या' बँकांच्या ऑफर चेक करा

Saving Accounts वर 7 टक्के व्याज हवंय? 'या' बँकांच्या ऑफर चेक करा

'बँक बाजार'ने गोळा केलेल्या आकडेवारीनुसार, व्याजदरात घसरण होत असताना स्मॉल फायनान्स बँका (Small Finance Banks) अधिक व्याजदर देत आहेत. बचत खात्यांवर (Saving Account) सर्वोत्तम व्याजदर देणार्‍या स्मॉल फायनान्स बँका आणि खाजगी बँकांची (Private Banks) येथे माहिती देत आहोत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 16 डिसेंबर : अनिश्चिततेच्या काळात आणि अनपेक्षित गरजांसाठी तुम्ही तुमच्या अतिरिक्त उत्पन्नाचा (Income) काही भाग बचत खात्यांमध्ये ठेवता. 'बँक बाजार'ने गोळा केलेल्या आकडेवारीनुसार, व्याजदरात घसरण होत असताना स्मॉल फायनान्स बँका (Small Finance Banks) अधिक व्याजदर देत आहेत. बचत खात्यांवर (Saving Account) सर्वोत्तम व्याजदर देणार्‍या स्मॉल फायनान्स बँका आणि खाजगी बँकांची (Private Banks) येथे माहिती देत आहोत. BankBazaar ने 1 डिसेंबर 2021 पर्यंतचा डेटा संकलित केला आहे. ज्या बँकांच्या वेबसाईट्स ही माहिती देत ​​नाहीत त्यांच्या डेटाचा विचार करण्यात आलेला नाही.

खाते उघडण्यापूर्वी हे तपशील तपासा

नवीन रिटेल ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्मॉल फायनान्स बँका मोठ्या खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपेक्षा जास्त व्याजदर देत आहेत. तुम्ही लॉन्ग ट्रॅक रेकॉर्ड, चांगले सर्विस स्टँडर्ड्स, मोठे ब्रान्च नेटवर्क आणि वेगवेगळ्या शहरांमधील एटीएम सेवा असलेली बँक निवडावी, जेणेकरून चांगला व्याजदर तुमचा बोनस असेल.

तुमचा पगार 15 हजारहून कमी असेल तर लगेच इथे रजिस्ट्रेशन करा; 'या' योजनेचा फायदा मिळेल

AU Small Finance Bank: ही बँक आपल्या बचत खात्यांवर 7 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे. यासाठी सरासरी 2000 ते 5000 रुपये मासिक शिल्लक आवश्यक आहे.

Ujjivan Small Finance Bank: ही बँक बचत खात्यांवर 7 टक्के व्याज देत आहे.

Equitas Small Finance Bank: इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बचत खात्यांवर 7 टक्के व्याज देत आहे. यासाठी 2,500 ते 10,000 रुपये सरासरी मासिक शिल्लक राखणे आवश्यक आहे.

Investment Tips: या 10 शेअर्सने 5 वर्षात 10 लाख रुपयांचे केले 1.7 कोटी रुपये, पाहा कोणते आहे हे स्टॉक्स

DCB Bank: DCB बँक बचत खात्यांवर 6.5 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे. ही बँक खाजगी बँकांमध्ये सर्वोत्तम व्याजदर देत आहे. यामध्ये 2,500 ते 5,000 रुपयांपर्यंत किमान शिल्लक ठेवावी लागेल.

Suryoday Small Finance Bank: ही बँक बचत खात्यांवर 6.25 टक्के व्याज देत आहे. सरासरी मासिक शिल्लक रुपये 2,000 राखणे आवश्यक आहे.

First published:

Tags: Money, Saving bank account, बँक