Home /News /money /

Electric Car खरेदीचा विचार करताय? 'या' बँकेकडून मिळेल आकर्षक ऑफर

Electric Car खरेदीचा विचार करताय? 'या' बँकेकडून मिळेल आकर्षक ऑफर

नवीन इलेक्ट्रिक टू-व्हीलर खरेदी करण्यासाठी तुम्ही 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकता, तर कारवर कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही नवीन इलेक्ट्रिक 4-व्हीलरसाठी 84 महिन्यांत कर्जाची परतफेड करू शकता.

    मुंबई, 9 एप्रिल : डिझेल-पेट्रोलच्या सतत वाढत चाललेल्या किमती आणि इलेक्ट्रिक वाहनांना (EVs) प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या योजनेमुळे आजकाल इलेक्ट्रिक कार लोकांच्या पसंतीस उतरत आहेत. बरेच लोक आता त्यांच्या पेट्रोल किंवा डिझेल कारमधून इलेक्ट्रिक वाहनांकडे जाण्याचा विचार करत आहेत. याचे कारण म्हणजे डिझेल-पेट्रोल वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहन चालवण्यासाठी कमी खर्च येतो. आयकर विभागाच्या वेबसाइटनुसार, इलेक्ट्रिक वाहन हे विशेषत: इलेक्ट्रिक मोटरद्वारे चालवले जाणारे वाहन आहे ज्याची कर्षण ऊर्जा वाहनात विशेष स्थापित केलेल्या ट्रॅक्शन बॅटरीद्वारे पुरवली जाते. अनेक बँका अशा इलेक्ट्रिक वाहनांसाठी आकर्षक दरात कर्ज देत आहेत. इलेक्ट्रिक कारच्या खरेदीसाठी कर्ज देणार्‍या बँकांवर एक नजर टाकूया. SBI ग्रीन लोन सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI ने इलेक्ट्रिक वाहन खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी देशातील पहिले ग्रीन कार कर्ज सुरू केले होते. यामध्ये, व्याज दर सध्याच्या वाहन कर्ज योजनेच्या दरापेक्षा 20 बेसिक पॉइंट कमी आहे. SBI वेबसाइटनुसार, ऑन-रोड किमतीच्या 90 टक्के ते 100 टक्के लोन निवडक मॉडेल्सवर उपलब्ध असतील. ग्रीन कार कर्जाचे व्याज दर 7.05 टक्के ते 7.75 टक्क्यांपर्यंत आहेत. इन्फोसिसच्या नारायण मूर्तींची मुलगी अक्षता ब्रिटनच्या राणीपेक्षाही श्रीमंत! कसे ते जाणून घ्या? याशिवाय युनियन बँक इलेक्ट्रिक वाहनांसाठी आकर्षक व्याजदरावर कर्जही देत ​​आहे. अॅक्सिस बँक पगारदार व्यक्ती आणि खाजगी व्यवसाय चालवणाऱ्या ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनाच्या ऑन रोड किमतीच्या 85 टक्क्यांपर्यंत कर्ज देत आहे. कार कर्ज मर्यादा नाही नवीन इलेक्ट्रिक टू-व्हीलर खरेदी करण्यासाठी तुम्ही 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकता, तर कारवर कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही नवीन इलेक्ट्रिक 4-व्हीलरसाठी 84 महिन्यांत कर्जाची परतफेड करू शकता, तर नवीन इलेक्ट्रिक 2-व्हीलरसाठी 36 महिन्यांपासून ते 60 महिन्यांपर्यंतचा कालावधी आहे. कर्ज पात्रता >> भारताचे स्थायी निवासी किंवा अनिवासी भारतीय (NRI) कर्ज घेऊ शकतात. >> किमान वय 18 वर्षे आणि कमाल 75 वर्षे. >> वयाच्या 60 वर्षांनंतरही ज्यांच्या उत्पन्नाचा नियमित स्रोत आहे. >> तुम्ही इतर पात्र व्यक्तींसोबत वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तपणे कर्ज घेऊ शकता. 3 अर्जदारांची कमाल मर्यादा आहे. म्हणजेच, मुख्य अर्जदारासह जास्तीत जास्त 2 सह-अर्जदार असू शकतात. >> सह-अर्जदारांमध्ये जोडीदार, वडील, आई, मुलगा, अविवाहित मुलगी यांचा समावेश होतो. Rakesh Jhunjhunwala यांनी 'या' बँकेत वाढवली आपली हिस्सेदारी; वर्षभरात आधीच दिलाय 70 टक्के परतावा कर वाचवू शकता जर तुम्ही इलेक्ट्रिक वाहन खरेदी केले तर तुम्ही 1.5 लाख रुपयांपर्यंतचा करही वाचवू शकता. जे लोक कर्जावर इलेक्ट्रिक वाहन खरेदी करतात ते कलम 80EEB अंतर्गत कर्जासाठी भरलेल्या व्याजावर 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर कपातीसाठी पात्र असतील. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, यासाठी कर्ज 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2023 दरम्यान मंजूर केले जावे. तसेच, केवळ वैयक्तिक करदाते किंवा व्यावसायिकांनाच त्याचा लाभ मिळेल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Electric vehicles, Income tax, SBI bank

    पुढील बातम्या