मराठी बातम्या /बातम्या /मनी /

पैसे नाहीत म्हणून उच्च शिक्षण थांबणार नाही; 'या' बँका देतात परवडणाऱ्या दरात शैक्षणिक कर्ज

पैसे नाहीत म्हणून उच्च शिक्षण थांबणार नाही; 'या' बँका देतात परवडणाऱ्या दरात शैक्षणिक कर्ज

एज्युकेशन लोनमध्ये बँक कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी विद्यार्थ्याची असल्याचे मानते. म्हणजेच ईएमआय कोर्स पूर्ण झाल्यानंतर 6 महिन्यांनंतर सुरू होतो.

एज्युकेशन लोनमध्ये बँक कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी विद्यार्थ्याची असल्याचे मानते. म्हणजेच ईएमआय कोर्स पूर्ण झाल्यानंतर 6 महिन्यांनंतर सुरू होतो.

एज्युकेशन लोनमध्ये बँक कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी विद्यार्थ्याची असल्याचे मानते. म्हणजेच ईएमआय कोर्स पूर्ण झाल्यानंतर 6 महिन्यांनंतर सुरू होतो.

  मुंबई, 12 ऑगस्ट : पैसे नाही म्हणून उच्च शिक्षण थांबवण्याचा विचार करत असाल तर शैक्षणिक कर्ज तुमची अडचण दूर करु शकतं. कारण उच्च शिक्षणाचा खर्च बऱ्याच जणांच्या बजेडबाहेर आहे. त्यामुळे काही जण शिक्षण सोडण्याचा विचार करतात. मात्र देशातील अनेक बँका अतिशय परवडणाऱ्या दरात आणि अटींवर शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देत आहेत. ज्याच्या मदतीने तुम्ही देशातच नाही तर परदेशातही उच्च शिक्षण घेऊ शकता. अशाच काही बँकांबद्दल आज माहिती घेऊया जेथे 8 टक्के किंवा त्यापेक्षा कमी दराने शैक्षणिक कर्ज मिळू शकते. शैक्षणिक कर्जाच्या अटी देशातील किंवा परदेशातील मान्यताप्राप्त संस्थेत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला शैक्षणिक कर्ज उपलब्ध आहे. शैक्षणिक कर्जासाठी वयोमर्यादा नाही परंतु काही बँका एका वयानंतर शैक्षणिक कर्ज देत नाहीत. अशा परिस्थितीत बँकेकडून अटींची माहिती घ्यावी. बँकेच्या अर्जासोबत संस्थेचे पत्र, फीची रचना, गुणपत्रिका आणि सह-अर्जदाराच्या उत्पन्नाशी संबंधित कागदपत्रे मागवली जातात.

  बँकेत FD करण्याआधी RBIने बदललेले नियम जाणून घ्या, अन्यथा होईल मोठं नुकसान

  एज्युकेशन लोनमध्ये बँक कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी विद्यार्थ्याची असल्याचे मानते. म्हणजेच ईएमआय कोर्स पूर्ण झाल्यानंतर 6 महिन्यांनंतर सुरू होतो. बँका त्यांच्या स्तरावर हा कालावधी वाढवू शकतात. मात्र, त्यानंतर कर्ज फेडण्याची जबाबदारी सहअर्जदाराला घ्यावी लागते. कर्जावरील व्याजावर आयकर सूट मिळते. शैक्षणिक कर्जाचे दर किती? सेंट्रल बँक सध्या 6.95 टक्के दराने शैक्षणिक कर्ज देत आहे. जर तुम्ही 7 वर्षांसाठी 20 लाख रुपयांचे शैक्षणिक कर्ज घेतले तर तुमचा EMI 30 हजार रुपयांपेक्षा थोडा जास्त असेल. एसबीआय आणि युनियन बँक सर्वात कमी 7-7 टक्के दराने शैक्षणिक कर्ज देत आहेत. 7 वर्षांसाठी 20 लाख रुपयांच्या कर्जावरील EMI 30,185 रुपये असेल. रेपो दरवाढीचा अनेकांना फायदा; 'या' दोन बँकांनी आपल्या FD व्याजदरात केली वाढ IOB, इंडियन बँक, बँक ऑफ बडोदा आणि IDBI बँक त्यांच्या ग्राहकांना किमान 7 ते 7.5 टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज देत आहेत. PNB, BOI, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब आणि सिंध बँक 7.5 ते 8 टक्के व्याजदर देत आहेत. UCO बँक, दक्षिण भारतीय बँक त्यांच्या ग्राहकांना 8 ते 9 टक्के लोन देत आहेत.
  Published by:Pravin Wakchoure
  First published:

  Tags: Education, Loan, Money

  पुढील बातम्या