मुंबई, 10 जुलै: अलीकडेच झालेल्या विलिनीकरणाच्या (PSU Bank Merger) प्रक्रियेनंतर अनेक बँकांचे आयएफएससी कोड (Bank IFSC Code) बदलले आहेत. यानंतर ग्राहकांना त्यांचे जुने इंडियन फाइनान्शिअल सिस्टम कोड (IFSC) हटवावे लागतील. त्यामुळे तुमच्याकडे अद्यापही जुना IFSC कोड असेल तर विविध बँकिंग व्यवहार करताना तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. जुने आयएफएससी कोड ऑनलाइन बँकिंगसाठी अमान्य असतील. पब्लिक सेक्टरमधील या विलिनीकरणात सिंडिकेट बँक, अलाहाबाद बँक, देना बँक, यूनाइटेड बँक ऑफ इंडिया, विजया बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचा समावेश आहे. त्यामुळे तुम्ही जर या बँकांचे ग्राहक असाल तर तुमच्या नवीन आयएफएससी कोडबाबत माहित करून घेणं आवश्यक आहे.
हे वाचा-मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी या बँकेची खास ऑफर, उघडता येईल स्पेशल खातं!
बँक खातेधारकांना कोणतीही ऑनलाइन सेवा मिळवण्यासाठी विलिनीकरणानंतर जुन्या आयएफएससी कोडचा वापर करता येणार नाही. तुम्हाला जर नवीन IFSC कोडची माहिती हवी असेल तर तुम्ही संबंधिंत बँकेच्या पोर्टलवर जाऊन किंवा बँकेला भेट देऊन याबाबत माहिती मिळवू शकता. पोर्टलच्या माध्यमातून खातेधारक नवीन IFSC कोडसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात. ज्यामध्ये त्यांना सर्व डिटेल्स पुन्हा एकदा प्रविष्ट करावे लागतील. नवीन नियमानुसार पेयी ची लिस्ट पुन्हा लिस्टेड आणि रजिस्टर करण्याची आवश्यकता आहे.
हे काम खातेधारकांची नावे, खाते क्रमांक, संपर्क तपशील आणि बँक तपशील इ. माहिती जोडून पूर्ण केले जाते, ज्यामध्ये नवीन आयएफएससी कोड देखील समाविष्ट केला जातो. नव्याने विलीन झालेल्या बँकांचे खातेदार प्रलंबित नोंदणीनंतरच नेट बँकिंग सुविधांद्वारे ऑनलाईन पैसे हस्तांतरित करू शकतील.
हे वाचा-'या' कर्मचाऱ्यांसाठी Good News, दरवर्षी मिळणार 10 दिवसांची Surprise सुट्टी!
कोणत्या बँकांचं विलिनीकरण?
-ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँकेचे पंजाब नॅशनल बँकेमध्ये विलिनीकरण
-सिंडिकेट बँकेचं कॅनरा बँकेत विलिनीकरण
-आंध्रा बँक आणि कॉरपोरेशन बँकेचं यूनियन बँकेत विलिनीकरण
-अलाहाबाद बँकेचे इंडियन बँकेत विलिनीकरण
-विजया बँक आणि देना बँकेचं बँक ऑफ बडोदामध्ये विलिनीकरण
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bank, Bank details, Bank services