मराठी बातम्या /बातम्या /मनी /या बँकांमधील बचत खात्यात मिळतंय सर्वाधिक व्याज, वाचा कुठे मिळेल जास्त फायदा

या बँकांमधील बचत खात्यात मिळतंय सर्वाधिक व्याज, वाचा कुठे मिळेल जास्त फायदा

आयडीबीआय बँक (IDBI Bank) आणि कॅनरा बँक (Canara Bank) बचत खात्यावर अनुक्रमे 3.5 टक्के आणि 3.2 टक्के व्याज देते आहे.

आयडीबीआय बँक (IDBI Bank) आणि कॅनरा बँक (Canara Bank) बचत खात्यावर अनुक्रमे 3.5 टक्के आणि 3.2 टक्के व्याज देते आहे.

आयडीबीआय बँक (IDBI Bank) आणि कॅनरा बँक (Canara Bank) बचत खात्यावर अनुक्रमे 3.5 टक्के आणि 3.2 टक्के व्याज देते आहे.

नवी दिल्ली, 16 जानेवारी: गेल्या काही काळापासून बँकांवरील बचत खात्यावर ग्राहकांना कमी व्याज (Interest Rate) मिळते आहे. या दरामध्ये कपातच होत आहे. खाजगी आणि स्मॉल फायनान्स बँकांच्या तुलनेत सार्वजनिक क्षेत्रातील बँका बचत खात्यावर खूप कमी व्याज देतात. दरम्यान सार्वजनिक क्षेत्रातील काही बँका बचत खात्यावर चांगले व्याज देत आहेत.

बँक बझारच्या आकडेवारीनुसार सार्वजनिक क्षेत्रातील आयडीबीआय बँक (IDBI Bank) आणि कॅनरा बँक (Canara Bank) बचत खात्यावर अनुक्रमे 3.5 टक्के आणि 3.2 टक्के व्याज देतात. खाजगी बँकांमध्ये मिळणाऱ्या व्याजदरांची तुलना या बँकांच्या व्याजदराशी केली जाऊ शकते. उदाहरणार्थ एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक 3 ते 3.5 टक्के व्याज देतात. आणि कोटक महिंद्रा बँक 3.5 टक्के तके 4 टक्के व्याज ऑफर करतात. अलीकडेच कॅनरा बँकेने फिक्स्ड डिपॉझिटवर व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

टॉप 10 व्याजदर ऑफर करणाऱ्या बँकांमध्ये SBI नाही

खाजगी क्षेत्र आणि स्मॉल फायनान्स बँका ग्राहकांना बचत खात्यावर अधिक व्याज देत असल्या तरीही पब्लिक सेक्टरमधील मोठ्या बँका बचत खातेधारकांना कमी व्याज देतात. स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) आणि बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) क्रमशः 2.70 टक्के आणि 2.75 टक्के व्याज देत आहेत. सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या टॉप 10 बँकांच्या यादीमध्ये बँक ऑफ बडोदा सर्वात खालच्या स्थानी आहे तर एसबीआय या यादीमध्ये नाहीच आहे.

स्मॉल फायनान्स बँका बचत खात्यावर देत आहेत 7 टक्क्यांपर्यंत व्याज

बचत खातेधारकांना स्मॉल फायनान्स बँकांकडून मिळणारे व्याज सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपेक्षा अधिक आहे. उदाहरणार्थ एयू स्मॉल फायनान्स बँक (AU Small Finance) आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक (Ujjivan Small Finance Bank) अनुक्रमे 7 टक्के आणि 6.5 टक्के व्याजदर देत आहेत.

First published: