• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Salary Account सोबत बँकेकडून मिळतात या सुविधा फ्री

Salary Account सोबत बँकेकडून मिळतात या सुविधा फ्री

आज आम्ही तुम्हाला सॅलरी अकाउंट बद्दल काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. जाणून घ्या सविस्तर...

 • Share this:
  नवी दिल्ली, 12 जून: नोकरी करणाऱ्या लोकांना कंपनी एक स्पेशल बँक अकाउंट देते. त्याला सॅलरी अकाउंट (salary account) म्हणतात. हे अकाउंट रेग्यूलर अकाउंटपेक्षा वेगळं असतं आणि याचे बरेच फायदे आहेत. याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नसतं. बँकादेखील (Banks) याबाबत खातेधारकांना माहिती देत नाहीत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सॅलरी अकाउंट बद्दल काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. SBI सॅलरी अकाउंट वर कॉर्पोरेट्स, हॉस्पिटल, हॉटेल कर्मचाऱ्यांना अनेक फायदे मिळतात. सॅलरी अकाउंट उघडल्यानंतर तुम्हाला अकाउंट नंबर दिला जातो आणि कॉर्पोरेट इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून एंप्लॉयर तुमच्या खात्यात सॅलरी जमा करतात. कर्मचारी त्या बँकेच्या देशातील कोणत्याही ब्रँचमध्ये सॅलरी अकाउंट उघडू शकतात. SBI सॅलरी अकाउंटचे फायदे - झिरो बॅलेंस अकाउंट - कोणत्याही बँकेच्या एटीएममधून फ्री अनलिमिटेड ट्रॅन्झॅक्शन - फ्री एटीएम कम डेबिट कार्ड - जॉइंट अकाउंट होल्डरसाठी एटीएम कार्ड - फ्री मल्टीसिटी चेक - लॉकर चार्ज वर 25 टक्के सूट - फ्री ड्राफ्ट, एसएमएस अलर्ट, ऑनलाइन NEFT/RTGS - 2 महिन्यांच्या सॅलरीवर ओवरड्राफ्ट सुविधाsala तुमच्या खात्यातून पैसे गहाळ झाल्यास इथं तक्रार केल्यास संपूर्ण पैसे मिळतील परत चला जाणून घेऊया आणखी काही फायदे 1. बँकेकडून डेडिकेटेड वेल्थ मॅनेजर जर तुमच्याजवळ जास्त पैसे असतील तर तुम्ही वेल्थ सॅलरी अकाउंट (wealth salary account) उघडू शकता. याच्या माध्यमातून बँक तुम्हाला डेडिकेटेड वेल्थ मॅनेजर देते. हा मॅनेजर तुमच्या बँकेचे सर्व व्यवहार बघतो. 2. फ्री इंटरनेट ट्रॅन्झॅक्शन काही बँका पॅरोल अकाउंट्सला क्रेडिट कार्ड (credit card), फ्री इंटरनेट ट्रॅन्झॅक्शन, ओवरड्राफ्ट (overdraft), स्वस्त लोन, चेक, पे ऑर्डर (pay order) आणि डिमांड ड्राफ्टची फ्री रेमिटेंस (परदेशातून येणारा पैसा) या सारख्या अनेक सुविधा देतात. 3. सेव्हिंग अकाउंट सॅलरी अकाउंटमध्ये बदलतं तुमच्या खात्यात काही काळापासून सॅलरी येत नसेल तर तुम्हाला दिल्या जाणाऱ्या सुविधा थांबवल्या जातात. तसेच तुमचं अकाउंट नॉर्मल सेव्हिंग अकाउंटमध्ये बदलतं. 4. अकाउंट सहज ट्रांसफर करता येतं सॅलरी अकाउंट एका बँकेतून दुसऱ्या बँकेत बदलण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. यासाठी काही अटी नक्कीच असतात. सॅलरी अकाउंट उघडण्यासाठी तुम्ही कॉर्पोरेट, सरकारी किंवा पीएसयूमध्ये काम करत असायला पाहिजे. तसेच तुमच्या कंपनीची बँकेसोबत सॅलरी अकाउंट रिलेशनशिप असायला पाहिजे. सोबतच संबंधित व्यक्तिचं त्या बँकेत आधी अकाउंट नसावं. 5. इतर काही सुविधा बँक तुम्हाला पर्सनलाइज्ड (वैयक्तिक) चेक बुक देते. त्यातील प्रत्येक चेकवर तुमचं नाव असतं. तुम्ही बिल भरण्याची सुविधा घेऊ शकता. किंवा फोन अथवा इंटरनेटच्या माध्यमातून पेमेंट करू शकता. सेफ डिपॉझिट लॉकर, स्वाइप इन, सुपर सेव्हर फॅसिलिटी, फ्री पेबल ॲट पार चेकबुक, फ्री इंस्टाअलर्ट्स, फ्री पासबुक आणि फ्री ईमेल स्टेटमेंट सारख्या सुविधा बँकेकडून दिल्या जातात.
  Published by:Sunil Desale
  First published: